शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इमारत फीची सक्ती, कोल्हापुरातील होलीक्रॉस शाळेत तोडफोड, कार्यालयामध्ये घुसुन नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:13 IST

पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील होलीक्रॉस हायस्कुलची तोडफोड केली आहे. कार्यालयामध्ये घुसुन १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचांवर दगड फेकून नासधूस केली आहे. कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि कार्यालयीन साहित्य सुद्धा कार्यकर्त्यांनी विस्कटून टाकले आहे. याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.

ठळक मुद्देकोल्हापुरातील होलीक्रॉस शाळेत तोडफोड, इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ कार्यालयामध्ये घुसुन नुकसान

कोल्हापूर  : पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील होलीक्रॉस हायस्कुलची तोडफोड केली आहे. कार्यालयामध्ये घुसुन १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचांवर दगड फेकून नासधूस केली आहे. कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि कार्यालयीन साहित्य सुद्धा कार्यकर्त्यांनी विस्कटून टाकले आहे. याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला शिक्षकांना शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप येथील प्रसाशनाने केला आहे. दरम्यान इमारत फी विद्यार्थ्यांना सक्तीची करू नये असे निवेदन शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र यावर शाळा प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नव्हता उलट विध्यार्थ्यांकडूनच इमारत फी घ्यावी अशी भूमिका शाळेने ठेवल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. याला विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफाड केली. पोलिसानी घटना स्थळी धाव घेत माहिती घेतली आहे. 

दरम्यान यावर आपली भूमिका स्पष्ट करताना शाळेने फी संदर्भातील निर्णयाला कोणत्याही पालकांची लेखी तक्रार नव्हती तरीही  कार्यकर्त्यांनी प्रचंड निर्माण दहशत करत कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर