शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या ‘बंद’ला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:29 IST

राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देतहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने कोल्हापूर शहरात कार्यकर्ते-पोलिसांत शाब्दिक चकमक

कोल्हापूर : राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. शहर राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. बस वाहतूक रोखताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत काही काळ शाब्दिक चकमक उडाली.शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती. सकाळच्या टप्प्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वत:हून व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे एरव्ही गजबजलेला महाद्वार रोड, पापाची तिकटी, अंबाबाई मंदिर, राजारामपुरी हा परिसर तसा शांतच होता. बस व खासगी वाहतूक सुरू राहिल्याने नागरिकांना त्याचा फारसा त्रास झाला नाही.

शहर राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौकातून दुचाकी रॅली काढून भाजप सरकार, ‘ईडी’ व केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. महाराणा प्रताप चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीमार्गे शिवाजी चौकात रॅली विसर्जित करण्यात आली.

शिवाजी चौकात रॅलीत महापौर माधवी गवंडी, प्रा. जयंत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, महेंद्र चव्हाण, जयकुमार शिंदे, रमेश पोवार, प्रकाश गवंडी, किसन कल्याणकर, जहिदा मुजावर, विनायक फाळके, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनेकरवीर तालुका राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, अप्पासाहेब धनवडे, दत्ता गाडवे, तानाजी शेलार, सदाशिव पाटील, संभाजी पाटील, रंगराव कोळी, दिलीप सावंत, नामदेव परीट, सुनील परीट, सुरेश पाटील, जी. डी. पाटील, मिलिंद पाटील, राजाराम कासार, सुलतान मुल्लाणी, आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्यावरील कारवाई मागे घ्या, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला.र

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर