शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपसा केंद्राची कामे मुदतीत पूर्ण करा, सुट्टीदिवशी आयुक्तांनी घेतला प्रदूषणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:15 IST

लाईन बझार व बापट कॅम्प येथील सांडपाणी उपसा केंद्राची कामे ठेकेदाराकडून मुदतीत करून घ्या आणि तेथील सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडे वळवा, अशा सक्त सूचना गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय हरित लवादाने केलेला दंड आणि आणि परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याच्या दिलेल्या आदेशाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी सुट्टीदिवशीही फिरती करून पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आढावा घेतला.

ठळक मुद्देउपसा केंद्राची कामे मुदतीत पूर्ण करासुट्टीदिवशी आयुक्तांनी घेतला प्रदूषणाचा आढावा

कोल्हापूर : लाईन बझार व बापट कॅम्प येथील सांडपाणी उपसा केंद्राची कामे ठेकेदाराकडून मुदतीत करून घ्या आणि तेथील सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडे वळवा, अशा सक्त सूचना गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय हरित लवादाने केलेला दंड आणि आणि परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याच्या दिलेल्या आदेशाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी सुट्टीदिवशीही फिरती करून पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आढावा घेतला.आयुक्त कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, अभियंता गायकवाड, आदी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचगंगेचे प्रदूषण रोखण्याबाबत महानगरपालिकेने हाती घेतलेल्या कामांची पाहणी केली. बापट कॅम्प व लाईन बझार येथे बांधण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तेथील कामे नेमक्या कोणत्या टप्प्यात आहेत याची माहिती घेतली.

दोन्ही केंद्रांतील सिव्हिल कामे पूर्ण झाली असून, केवळ पंपिंग मशिनरी उभी केलेली नाही. ती का बसविली नाही, अशी विचारणा आयुक्तांनी केली. त्यावेळी पंपिंग मशिनरी जोडण्याचे काम लवकरच सुरू होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ही कामे मुदतीत पूर्ण करून घ्या आणि प्रक्रिया केंद्राकडे सांडपाणी वळवा, अशा सूचना कलशेट्टी यांनी दिल्या.त्यानंतर ७५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची त्यांनी पाहणी केली. तेथे येणारे सांडपाणी, त्याचे प्रमाण, केंद्राची क्षमता, सांडपाण्यावर होणारी प्रक्रिया, पाण्यातील बीओडीचे प्रमाण, नमुने घेण्याची पद्धत, इत्यादींबाबत आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली. प्रक्रिया होणाऱ्या सांडपाण्यात ८.३४ इतक्या प्रमाणात बीओडी असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रिया केंद्राला लागून असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पालाही आयुक्तांनी भेट दिली.कदमवाडी तसेच महालक्ष्मीनगर परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी नुकतीच केली होती. या संदर्भात आयुक्तांनी स्वत: २५-३० घरांत जाऊन चौकशी केली. एकाच गल्लीत एका बाजूला पाणी मिळते आणि दुसऱ्या बाजूला पाणी मिळत नाही, अशा तक्रारी समोर आल्या. त्यावेळी आयुक्तांनी हा काय प्रकार आहे, याचा शोध घ्यावा आणि पाणीपुरवठ्यात सुरळीतपणा आणावा, अशी सूचना केली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर