शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:34 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी बुधवारी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी बुधवारी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला.गेली अडीच वर्षे नर्सरी बागेतील खुल्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले जात आहे. त्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतूदही केली आहे; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम रेंगाळले असून, ते कधी पूर्ण होणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे महापौर शोभा बोंद्रे यांनी बुधवारी समाधिस्थळावरच बैठक आयोजित केली होती.या बैठकीला उपमहापौर महेश सावंत, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका शोभा कवाळे, नगरसेवक अफजल पीरजादे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्ट अभिजित जाधव उपस्थित होते.समाधिस्थळाचे काम पाहून सर्वच पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. काम अतिशय संथ गतीने सुरू असून आतापर्यंत ते पूर्ण व्हायला पाहिजे होते, अशा भावना पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. शाहूंच्या समाधिस्थळाच्या कामाबाबत अशी दिरंगाई व उदासीनता यापुढे खपवून घेणार नाही. जर दिरंगाई झाली तर अधिकाºयांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे उपमहापौर सावंत यांनी सांगितले.ठेकेदार पाटील यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले की, समाधिस्थळाचे सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही या आठवड्यात सुरू होईल. समाधिस्थळावरील मेघडंबरी पूर्वी दगडी होती, तिचे डिझाईन बदलण्यात आले. आता ती ब्रॉँझपासून बनविली जात आहे. तिच्या नक्षीदार कामास विलंब होत आहे. ठेकेदाराने हा खुलासा केल्यावर महापौर बोंदे्र यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्या बापट कॅम्प येथील कार्यशाळेत जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वजण तेथे गेले.मेघडंबरीचे काम अधिक कलाकुसरीचे असल्याने ओतीव काम, फिनिशिंगचे काम अतिशय किचकट व वेळखाऊ असल्याने विलंब होत आहे. तरीही बरेच काम पूर्ण झाले आहे. अजून एक-दीड महिना तरी या कामास लागतील, असे शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले.पाहणीनंतर कामास का विलंब होत आहे, हे सर्वच पदाधिकाºयांच्या लक्षात आले. शेवटी महापौर बोंद्रे यांनी १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करा, अशी सूचना केली.इटलीनंतर कोल्हापुरातचराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर उभारण्यात येत असलेली ब्रॉँझची मेघडंबरी ही इटलीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात तयार केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांची एक समाधी इटलीमधील फॉरेन्सिक शहरात आहे. राजाराम महाराज यांचे निधन इटलीमध्ये झाले. त्यांच्या स्मरणार्थ राजर्षी शाहू महाराज यांनी तेथे मेघडंबरी उभी केली आहे. तशी हुबेहुब मेघडंबरी कोल्हापुरातील समाधिस्थळावर उभारली जात आहे. तिचे खांब हे भवानी मंडपातील खांबासारखे आहेत. आतापर्यंत तीन टन ब्रॉँझ त्यासाठी वापरण्यात आले आहे.