शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेचे काम लवकर पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांची कोल्हापूर महापालिका, ठेकेदाराला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:22 IST

कोल्हापूर शहरातील अमृत योजनेतून करण्यात येत असलेली कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली

कोल्हापूर : शहरातील प्रलंबित असलेले ११६ कोटींचे अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांना केली. ठेकेदार कंपनीने डिसेंबर २०२३ अखेर योजनेचे काम पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली. कोल्हापूर शहरातील अमृत योजनेतून करण्यात येत असलेली कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ही बैठक मुंबईत घेण्यात आली.कोल्हापूर शहरासाठी राज्य सरकारकडून अमृत योजनेंतर्गत निधी मिळाला आहे. त्यातून जलवाहिनी तसेच ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम केले जात आहे. दि. १ सप्टेंबर २०१८ ला ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. काम पूर्ण करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत होती; परंतु या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर योजनेच्या कामासाठी ठेकेदाराला वारंवार मुदत देण्यात येत आहे; परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. अमृतचे काम करणारी ठेकेदार कंपनी एकच आहे; मात्र त्यांनी तब्बल १९ उपठेकेदार नेमले आहेत. परिणामी योजनेची कामे रखडली आहेत. योजनेंतर्गत ३९६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी काही किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे; परंतु खोदाई केलेल्या रस्त्यांचे ठेकेदार कंपनीने रिस्टाेरेशन न केल्याने शहरात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याबरोबरच अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १२ टाक्या आणि दोन संप बांधण्यात येणार आहेत; मात्र सर्वच कामे रखडली आहेत.गेली अनेक वर्षे निधी असूनही योजनेचे काम रखडले असल्याने मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे, जल अभियंता घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे