शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

Kolhapur: वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे पंचनामे वेळेत करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:37 IST

वाहनांच्या नुकसानीचीही मिळणार भरपाई

कोल्हापूर : वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत न करणाऱ्या व नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. एकाच भागात वारंवार शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर संपूर्ण शेतीक्षेत्राचा विचार करून नुकसानभरपाई निश्चित करा, वन्यप्राण्यांमुळे वाहनांचे नुकसानही मदतीच्या कक्षेत आणा असेही पालकमंत्र्यांनी सुचवले.आजरा तालुक्यातील आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन देत भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक पाटील यांनी विशेष बाब म्हणून पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शासन निर्णयानुसार पंचनामे व नुकसानभरपाई ठरवावी, पंचनामे एकदाच न करता वास्तविक नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. वन्यप्राणी दिसल्यानंतर तातडीने संरक्षण दल घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा तत्पर ठेवा, एकाच भागात वारंवार प्राण्यांची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करा. आठ दिवसांत वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी तालुक्यात वनविभाग, महसूल विभाग व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न तातडीने सोडवले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Act on delayed wildlife damage assessments, Minister warns.

Web Summary : Minister warns action for delayed wildlife damage assessments in Kolhapur. He urged fair compensation, including vehicle damage. Villagers requested relief from animal attacks. Joint meetings planned to resolve forest rights claims within eight days.