शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीच्या पूररेषेचे सर्व्हेक्षण पूर्ण, डिमार्केशन तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 11:58 IST

कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपूररेषेचे सर्व्हेक्षण पूर्ण, डिमार्केशन तपासणारशास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविणार

कोल्हापूर : शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पूररेषेचा शास्त्रीय अहवाल देण्याचे आदेश झाले आहेत; त्यामुळे तब्बल १३ वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील पूररेषा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार २००५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार डिमार्केशन तपासून अहवाल देण्यात येणार आहे.पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे १९८९, २००५ साली कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले होते; त्यामुळे पाटबंधारे विभागाने २००५ सालच्या महापुराची महत्तम रेषा आणि सरासरी पूररेषा निश्चित केली होती. तसा अहवाल राज्य सरकारलाही देण्यात आला होता; परंतु या पूररेषेतील प्रतिबंधित क्षेत्रात काही अटींवर बांधकाम करण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली होती; त्यामुळे पूररेषेत अनेक बांधकामे झाली आहेत.ज्यावेळी बांधकामांना प्रतिबंध करायची आवश्यकता होती, त्यावेळी महापालिका आणि राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि आता बांधकामे झाल्यावर अचानक पूररेषेची आठवण झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या या पूररेषेच्या शास्त्रीय अहवाल तयार करण्यास सांगून मूळ सर्वेक्षणात बदल करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका काही पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्तकरीत आहेत.

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर