सांगली-कोल्हापूर रस्ता वर्षात पूर्ण करू: धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:39 IST
< p >जयसिंगपूर : चार वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. अपुऱ्या कामामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या महामार्गावरील प्रलंबित कामांप्रश्नी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रश्न मांडला आहे. येत्या वर्षभरात सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी स्व. ...
सांगली-कोल्हापूर रस्ता वर्षात पूर्ण करू: धनंजय महाडिक
<p>जयसिंगपूर : चार वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. अपुऱ्या कामामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या महामार्गावरील प्रलंबित कामांप्रश्नी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रश्न मांडला आहे. येत्या वर्षभरात सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात रविवारी रात्री उद्योगपती विनोद घोडावत यांच्या एकसष्टीनिमित्त नागरी सत्कार व सन्मानपत्र प्रदान कार्यक्रमप्रसंगी खासदार महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती अविनाश पोतदार होते. प्रारंभी विनोद घोडावत व उज्ज्वला घोडावत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उद्योगपती हणमंतराव गायकवाड, शरद कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, उज्ज्वला घोडावत, दानचंद घोडावत, सतीश घोडावत, अरुंधती महाडिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी स्व. सुशीला घोडावत यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यानी स्वागत, तर नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विनोद घोडावत यांचा जीवनपरिचय असणाºया ‘यशवंत’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, घोडावत परिवाराने जयसिंगपूर शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.उद्योगपती हणमंतराव गायकवाड म्हणाले, आजच्या तरुण पिढीमध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. सचोटी, प्रामाणिक व धाडसाने चांगले काम केले तर यश निश्चित मिळेल.विनोद घोडावत म्हणाले, जीवनामध्ये पैशापेक्षा मित्रपरिवार महत्त्वाचे असतात. त्यांच्यामुळेच हा माझा सत्कार होत आहे. यापुढील काळात समाजकार्यासाठी झोकून देण्यासाठी निश्चितच या सत्कारातून मला बळ मिळाले आहे.याप्रसंगी रौनक घोडावत, संदीप घोडावत, डॉ. अशोकराव माने, शामसुंदर मालू, राजेंद्र झेले, राजेंद्र नांद्रेकर, विद्यासागर आडगाणे, डॉ. सविता पाटील, भाऊसाहेब नाईक, दादा पाटील-चिंचवाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रुस्तुम मुजावर यांनी आभार मानले.घोडावत यांचे योगदानजिद्द, कष्ट आणि अफाट चिकाटीच्या जोरावर घोडावत परिवाराने जयसिंगपूरचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले आहे. सामाजिक कार्यात विनोद घोडावत यांचे मोठे योगदान आहे. येत्या वर्षभरात कोल्हापूरचे विमानतळही आंतरराष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोल्हापूर-पुणे दुहेरी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या पाठबळाची गरज असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.