तब्बल २०५ एकरच्या विस्तीर्ण निसर्गरम्य परिसरात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एमबीए, ॲग्रीकल्चर व आर्किटेक्चर महाविद्यालय सुरू आहे. कोल्हापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळसंदे येथील महाविद्यालयात जाण्यासाठी विविध मार्गांवर ११ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध प्रकारची फळझाडे, भाजीपाला, शेततळी, तलाव यामुळे “ऑक्सिजन झोन” अशी या परिसराची ओळख झाली असून हे वातावरण आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला पूरक ठरत आहे. मुला-मुलींची हॉस्टेल, कँटीन, मेस, स्पोर्ट्स ग्राऊंड अशा उत्तम सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.
शिक्षक-विद्यार्थी व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ करणारी अध्ययन व अध्यापन पद्धत या महाविद्यालयात वापरली जाते. सेमिस्टरच्या मध्याला व शेवटी परीक्षा घेतल्यानंतर पालकांची बैठक घेऊन विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा मांडला जातो. कसबा बावडा येथील तीन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन तळसंदे येथील विद्यार्थ्यानाही मिळते. तसेच प्रोजेक्ट गायडन्स, इंडस्ट्री व्हिजिटसाठी विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण संधी मिळते.
कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ई-टीचिंग सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मोजक्या महाविद्यालयामध्ये या आर्किटेक्चर महाविद्यालयाचा समावेश होतो. विद्यार्थ्यांचीही ऑनलाईन हजेरी, गैरहजर असल्यास पालकाशी संपर्क आदी सुविधांमुळे या महाविद्यालयाची विश्वासार्हता वाढली आहे. महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी देश-विदेशातील आर्किटेक्चर स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व करीत यश मिळविले आहे. तळसंदे येथील महाविद्यालय प्रवेशासाठी कसबा बावडा येथील महाविद्यालयात ई व्हेरिफिकेशन केंद्र सुरू असल्याची माहिती प्राचार्य सी. एस. दुदगीकर यांनी दिली.