शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 10:12 IST

Uday Samant Kolhapur-राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.

ठळक मुद्देशिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार मंत्रालयातील बैठकीत निर्णय : मंत्रालय आपल्या दारी मोहिम कोल्हापुरातून

कोल्हापूर : राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.या बैठकीत पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रश्न व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढले जातील. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबिटकर यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी राज्यातील उच्चशिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील गैरकारभाराच्या कामकाजाचा आढावा घेतला होता.

त्यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आबिटकर यांनी प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करा. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल. त्याची सुरवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करून, जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील अशा दोषी अधिकारी व कर्मचारी यांना जागेवर निलंबित करण्यात येईल.यावेळी विभागीय सह. संचालक डॉ. अशोक उबाळे, प्रिआयएएस सेंटर कोल्हापूरच्या संचालिका सोनाली रोडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी विशांत भोसले, प्रा. शशिकांत कांबळे उपस्थित होते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर