शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निधीवाटपाच्या आधी तक्रारी, मग गळ्यात गळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:31 IST

zp, fund, kolhapurnews कोल्हापूर जिल्हा परिषदेत निधीवाटपातील असमानतेवरून विरोधकांशी सामना करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी स्वकियांचेच वाग्बाण झेलावे लागले. अध्यक्षांसह शिक्षण सभापतींच्या वाढीव निधीवर आक्षेप घेत, सदस्यांनी तक्रारींचे पाढेच वाचले. येथून पुढे झुकते माप देऊ, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तक्रारींनी सुरू झालेली बैठक महाविकास आघाडी एकसंधच राहील, असे सांगत गळ्यात गळे घालून संपली.

ठळक मुद्देनिधीवाटपाच्या आधी तक्रारी, मग गळ्यात गळेजिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांची बैठक : महाविकास आघाडी एकसंध राहणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत निधीवाटपातील असमानतेवरून विरोधकांशी सामना करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी स्वकियांचेच वाग्बाण झेलावे लागले. अध्यक्षांसह शिक्षण सभापतींच्या वाढीव निधीवर आक्षेप घेत, सदस्यांनी तक्रारींचे पाढेच वाचले. येथून पुढे झुकते माप देऊ, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तक्रारींनी सुरू झालेली बैठक महाविकास आघाडी एकसंधच राहील, असे सांगत गळ्यात गळे घालून संपली.बैठकीनंतर उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, पदाधिकाऱ्यांकडील वाढीव निधीबाबत सदस्यांमध्ये नाराजी होती; पण ती आम्ही दूर केली. त्यांची समजूत काढली असून, येथून पुढे महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे चांगला कारभार करू. विरोधकांना सामोरे जाऊ. निधीच्या वाटपाबाबत सदस्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन योजनेतील निधीचे वाटप केले जाईल.जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडीत निधीवाटपावरून रुसवे-फुगवे सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पार्टी मीटिंग बोलावली होती. समितीच्या सभागृहात दीड तास चाललेल्या या बैठकीत सत्ताधाऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. सत्ता असूनही पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याबद्दलची खंत व्यक्त करीत सदस्यांनी जाब विचारला.

यावरून आवाज वाढल्याने समिती सभागृहातील वातावरणही तंग झाले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासने, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, पक्षप्रतोद उमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बैठकीत सहभागी झाले.जिल्हा नियोजनमधून जास्त निधी देऊपदाधिकारी म्हणून निधीवाटपात झुकते माप असणारच; पण येथून पुढे जिल्हा नियोजनमधून आणि १५ : २० या योजनेअंतर्गत येणारा निधी सदस्यांमध्ये जास्त प्रमाणात दिला जाईल, असेही बैैठकीत ठरले; पण हे गाजर ठरू नये, अशाही भावना सदस्यांकडून व्यक्त झाल्या. राज्यात आपलेच सरकार आहे, आपले नेते मंत्री आहेत; त्यामुळे निधी भरपूर मिळेल; पण आपल्यात हवेदावे नकोत, असे सांगून समजूत काढण्याचा पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न झाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर