शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी राज्यात समिती

By admin | Updated: August 14, 2016 01:01 IST

समितीत १३ सदस्य : ‘नगरविकास’चे सचिव अध्यक्ष; राज्य शासनाने घेतली दखल

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --मोकाट कुत्र्यांची दहशत आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या यांची दखल अखेर महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मूलन आणि मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात विशेषत: दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या तीन महिन्यांत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. सुमारे १२५ हून अधिक जणांचा चावा घेतानाच सांगलीतील एका बालिकेचा बळीही त्यांनी घेतला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रात्रीचा प्रवास करणे मुश्कील झाले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकजण जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम जूनमध्येच सुरू केली आहे. ‘लोकमत’नेही २१ ते २४ जून या कालावधीत ‘मोकाट कुत्र्यांची दहशत’ या शीर्षकाखाली चार भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.मोकाट कुत्री आणि अन्य प्राण्यांच्या उच्चाटनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी केंद्र शासन आणि अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने दाखल केलेल्या शपथपत्रात अशा राज्यस्तरीय देखरेख समित्या स्थापन करण्यात येतील, असे म्हटले होते. त्यानुसार राज्य शासनाने ही १३ सदस्यीय देखरेख समिती स्थापन केली आहे. पशुसंर्वधन विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, केंद्रीय आणि राज्य अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाचा प्रत्येकी एक सदस्य, ठाणे, मुंबई महापालिकेचे आयुक्त, कुलगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने प्रमाणित केलेल्या संस्थेचा प्रतिनिधी, पशुसंर्वधन विभागाचे उपसंचालकहे या समितीचे अन्य सदस्य आहेत, तर नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त हे सदस्य सचिव आहेत.समितीची दर तीन महिन्याला बैठकया समितीची दर तीन महिन्याला बैठक होणार आहे. स्थानिक पातळीवर प्राणी जन्म नियंत्रण समित्या स्थापन करणे, व्यापक जिल्हानिहाय योजना तयार करणे, योजना राबविण्याकरिता संस्थांची निवड करणे, अशी संस्था उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष वाहन उपलब्ध करणे, प्राण्यांच्या नसबंदीकरिता दर ठरविणे, त्यात दरवर्षी सुधारणा करणे, कुत्र्यांच्या नसबंदीकरिता मनुष्यबळ उपलब्ध करणे याबाबत समिती कार्य करणार आहे.ठाण्यात ५० हजार!मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम नियमित राबविणाऱ्यांमध्ये मुंबई, पुण्यासह राज्यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच महापालिका किंवा नगरपालिका आहेत. अद्याप तेथेही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. मुंबईजवळच्याच ठाणे जिल्ह्यात ५० हजारांवर मोकाट कुत्री असल्याचे सांगण्यात येते.देशात सुमारे तीन कोटी मोकाट कुत्रीमोकाट कुत्र्यांची ही समस्या केवळ काही शहरांतच नव्हे, तर महाराष्ट्राबरोबरच देशभरात आहे. देशभरात सुमारे तीन कोटी मोकाट कुत्री आहेत. देशात दरवर्षी २० हजारांहून अधिक लोकांचा पिसाळलेले कुत्रे चावल्याने रेबीजची लागण होऊन मृत्यू होतो, असे ‘ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल’चा अहवाल सांगतो.