शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समिती ठरविणार 'निती', मगच उपकेंद्राला 'गती'; शिवाजी विद्यापीठाच्या सांगलीतील उपकेंद्रासाठी समिती स्थापन

By पोपट केशव पवार | Updated: November 29, 2023 12:49 IST

पोपट पवार  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात करण्यासाठी जनरेटा वाढत आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विद्यापीठाने ...

पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात करण्यासाठी जनरेटा वाढत आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विद्यापीठाने प्रस्ताव दिल्यास दोन मिनिटांत उपकेंद्राला मंजुरी देऊ, असे सांगितले आहे. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. उपकेंद्रासाठी जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालानंतरच विद्यापीठ प्रशासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहे.विद्यापीठाच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २८६ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांचा कार्यालयीन संबंध थेट विद्यापीठाशी येत असतो. मात्र, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अनेक तालुके हे विद्यापीठापासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. तेथून विद्यापीठात येणे विद्यार्थी, शिक्षकांना शक्य नाही.राज्य सरकारने २०१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याचे धोरणे आखले. त्यानंतर सांगली जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी जिल्ह्यात आटपाडी, जत, शिराळा, मिरज येथे उपकेंद्र व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला. मात्र, येथील कोणत्याच जागेवर एकमत न झाल्याने हा विषय रेंगाळत पडला. मात्र, आता पुन्हा या विषयाने उचल खाल्ली आहे.

समितीचे काम काय असणारउपकेंद्रासाठी स्थापन केलेल्या समितीची लवकरच बैठक होणार आहे. उपकेंद्रात कोणते अभ्यासक्रम असावेत, उपकेंद्रासाठी जागा, उपलब्ध मनुष्यबळ याचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाणार आहे. तो अहवाल आल्यानंतर विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे उपकेंद्रासाठीचा प्रस्ताव पाठविणार आहे. सध्या तरी भाड्याच्या जागेत उपकेंद्र सुरू करण्याचा मतप्रवाह आहे. त्यादृष्टीनेच हालचाली सुरू आहेत.

उपकेंद्र सांगलीत, सदस्य कोल्हापूरचे..विद्यापीठाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीत बहुतांशी सदस्य हे कोल्हापूरचे असल्याने उपकेंद्र सांगलीत होणार आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ मात्र कोल्हापूरचे का, अशी विचारणा सांगलीतून झाली.

सांगली जिल्ह्यातील कॉलेजची संख्या

  • कला, वाणिज्य व विज्ञान- ५८
  • शिक्षणशास्त्र- १२
  • अभियांत्रिकी, आर्किटेक्ट- ५
  • औषधनिर्माण शास्त्र- ५
  • विधी-३
  • शारीरिक शिक्षण- १

सांगलीत उपकेंद्र स्थापन करण्यासाठी विद्यापीठ सकारात्मक आहे. त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर प्रस्ताव पाठविणार आहोत. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यापीठात जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात विद्यापीठाचे उपपरिसर केंद्र सुरू करावे. त्यात जिल्ह्यात नसणारे अभ्यासक्रम सुरू व्हावेत. - संजय परमणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ.

उपकेंद्र स्थापन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची लवकरच बैठक घेणार आहे. या उपकेंद्रात कोणते अभ्यासक्रम असावे यावर अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल. - डॉ. व्ही. एम. पाटील, अध्यक्ष, उपकेंद्र निर्मिती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठSangliसांगली