काँग्रेसच्या संसदीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल यशवंत बँकेच्या वतीने संचालक बाजीराव खाडे व हणमंतवाडी सरपंचपदी संग्राम भापकर व सातार्डे सरपंचपदी दादासाहेब पाटील या बँकेच्या संचालकांची निवड झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अध्यक्ष एकनाथ पाटील होते. उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती संचालक सुभाष पाटील, निवास पाटील, भगवान सूर्यवंशी, युवराज पाटील, यशवंत शेलार, एस. के. पाटील, सुरेश अपराध, संभाजी नंदिवाले यावेळी उपस्थित होते.
(फोटो)
कुडित्रे, ता. करवीर येथील यशवंत बँकेच्या वतीने संचालक बाजीराव खाडे व हणमंतवाडी सरपंचपदी संग्राम भापकर व सातार्डे सरपंचपदी दादासो पाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर व संचालक.