शरद इन्स्टिट्यूटमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
यड्राव : मतदारांनी आपणास प्रभागाचे प्रतिनिधित्व दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहावे. जनहिताची कामे करताना गट-तटाचा विचार करू नये. यातूनच गावाचा आदर्श निर्माण होईल असेच कार्य आपल्या हातून व्हावे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपणास सक्रिय सहकार्य देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शरद इन्स्टिट्यूटमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री यड्रावकर यांच्याहस्ते सदस्य बाबासाहेब राजमाने, प्राची हिंगे, वंदना कदम, वैशाली साळोखे, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, अनिता माने, रंगराव कांबळे, महेश कुंभार, मंगल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत सरदार सुतार यांनी केले. याप्रसंगी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, गजाननराव सुलतानपुरे, जीवंधर मुरचिट्टे, सवितादेवी नाईक-निंबाळकर, कल्पना लड्डा, लक्ष्मीकांत लड्डा, महावीर पाटील, सचिन मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकाश अकिवाटे यांनी आभार मानले.