शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त कलशेट्टी बनले पर्यवेक्षक, परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:16 IST

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या साधेपणाची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी छोट्या-छोट्या कामांत कधी लक्ष घातले नाही. कलशेट्टी मात्र कर्तव्यभावनेतून अशा गोष्टीत लक्ष घालतात. त्याची चुणूक गुरुवारी (दि. २८) सर्वांनाच आली. शिक्षण समितीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या केटीएस परीक्षेवेळी कलशेट्टी यांनी चक्क परीक्षा केंद्राला भेट दिली आणि काही काळ पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

ठळक मुद्देआयुक्त कलशेट्टी बनले पर्यवेक्षक परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या साधेपणाची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी छोट्या-छोट्या कामांत कधी लक्ष घातले नाही. कलशेट्टी मात्र कर्तव्यभावनेतून अशा गोष्टीत लक्ष घालतात. त्याची चुणूक गुरुवारी (दि. २८) सर्वांनाच आली. शिक्षण समितीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या केटीएस परीक्षेवेळी कलशेट्टी यांनी चक्क परीक्षा केंद्राला भेट दिली आणि काही काळ पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील महानगरपालिका प्राथमिक शाळातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोल्हापूर प्रज्ञा शोध-म.न.पा.’ हा उपक्रम राबविला जात आहे. निवड चाचणीत ९० व ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या टप्प्यातील अंतिम परीक्षा गुरुवारी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या केंद्रावर पार पडली. परीक्षाकाळात आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही वेळ पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आनंददायी पद्धतीने बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून घेतली जाणारी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध - म.न.पा.’ (केटीएस) परीक्षा हा शिक्षण समितीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कलशेट्टी यांनी केले. यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रशासनाधिकारी केशव यादव, रमेश मस्कर, अरुणकुमार गवळी उपस्थित होते.प्रशासनाधिकारी यादव यांनी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा’ उपक्रमाची माहिती दिली. मुलांची गुणवत्ता, पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आनंददायी पद्धतीने बौद्धिक विकास होणार असल्याचे यादव यांनी सांगितले. परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्र वितरणाचा भव्यदिव्य सोहळा शिक्षण समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांना सांगितले.महापालिकेच्या २७ शाळांतील इयत्ता पहिलीचे २५१ तसेच दुसरीचे १५६ असे एकूण ४०७ विद्यार्थी अंतिम परीक्षेसाठी सहभागी झाले होते. सर्व सहभागी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले. केटीएस परीक्षेचे नियोजन कनिष्ठ लिपिक संजय शिंदे, अजय गोसावी, नीलेश सरनाईक, राजाराम शिंदे यांनी केले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर