कोल्हापूर : कन्झ्युमर प्रॉडक्टच्या विविध उत्पादनांसाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या संजय घोडावत ग्रुपने 'रायडर'द्वारे एनर्जी ड्रिंक्स क्षेत्रात दमदार पदार्पण केले.
गेल्या काही दशकांपासून भारतीय एनर्जी ड्रिंकच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ होत आहे. या काळात अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात आगमन केले व येथील बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. विदेशी कंपन्यांची मक्तेदारी असणाऱ्या एनर्जी ड्रिंकच्या व्यवसायात घोडावत ग्रुपने उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.
भारतीय ग्राहकांना आवडेल अशी चव, आकर्षक पॅकेजिंग व विविध ऑफरसह रायडर बाजारपेठेत उपलब्ध असून, ९० रुपये किंमत असणाऱ्या ‘रायडर’च्या एका कॅनसोबत २० रुपयांचे फटाके (नमकीन) फ्री मिळणार आहेत.
संजय घोडावत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, भारतामध्ये एनर्जी ड्रिंकच्या मार्केटचा वेगाने विस्तार होत आहे. आमच्या सर्वेक्षणानुसार २०२५ पर्यंत या मार्केटचा सीएजीआर ९.२२ टक्क्यांनी वाढेल. यामुळे रायडर हा आमच्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. आम्हाला खात्री आहे की, येत्या काळात एनर्जी ड्रिंक्सना एक मजबूत पर्याय म्हणून ‘रायडर‘ पुढे येईल.
फोटो ओळी : राजारामपुरी येथे संजय घोडावत ग्रुपच्या वतीने 'रायडर' एनर्जी ड्रिंकची सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय घोडावत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत, आदी उपस्थित होते. (फोटो-२००२२०२१-कोल-घोडावत)