कोल्हापूर : महापालिकेचे माजी स्थायी सभापती व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विचारेमाळ व सदरबाजार प्रभागात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, यामध्ये कोल्हापूर शहरातील तरुण कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. विचारेमाळ, सदरबाजार परिसरात तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून लाटकर यांना शुभेच्छा दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राजेश लाटकर यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. खासदार संजय मंडलिक, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार के. पी. पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यासह माजी नगरसेवक, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लाटकर यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. लाटकर यांच्या वाढदिवसाचे नियोजन विशाल चव्हाण, अजित कांबळे, सुहास शिरतोडे, रवी बाडगे, भरत सोनवणे, प्रशांत कुरणे, सचिन कांबळे, दशरथ कांबळे, विकास सावंत आदींनी केले.
फोटो ओळी : राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांना वाढदिवसानिमित्त पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आर. के. पोवार, ए. वाय. पाटील उपस्थित होते. (फाेटो-२४०१२०२१-कोल-राजेश लाटकर)