शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न स्तुत्य :डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:02 IST

Shivaji University Kolhapur- प्राध्यापकपदासाठी स्थाननिश्चितीचे प्रस्ताव कसे तयार करावेत, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचा ''सुटा''चा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात सुटातर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद‌्घाटनप्रसंगी डॉ. शिर्के बोलत होते.

ठळक मुद्देपदोन्नतीची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न स्तुत्य :डी. टी. शिर्के प्राध्यापक पदोन्नती प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर

कोल्हापूर : प्राध्यापकपदासाठी स्थाननिश्चितीचे प्रस्ताव कसे तयार करावेत, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचा ''सुटा''चा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात सुटातर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद‌्घाटनप्रसंगी डॉ. शिर्के बोलत होते.कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ह्यसुटाह्णने प्राध्यापकांच्या हक्कांसाठी व प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात सुटाची मोठी भूमिका आहे. यामुळे पदोन्नतीच्या निकषांचे नेमके आकलन होईल, अशाप्रकारचे उपक्रम सुटा राबविते, हे सर्वांसाठी अनुकरणीय आहे.प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी.एस. पाटील यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंधाचे प्रकाशन कसे करावे, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स आदीसंदर्भात मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. आर. जी. कोरबू यांनी, प्राध्यापक पदासाठीचे निकष व सहाव्या वेतन आयोगानुसार ए. पी.आय. फॉर्म कसा भरावा यासंदर्भात पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रकाश कुंभार यांनी, सातव्या वेतन आयोगातील प्राध्यापक पदासाठी स्थाननिश्चितीच्या तरतुदी व वार्षिक स्वयंमूल्यमापन अहवालासंदर्भात सादरीकरण केले.तिसऱ्या सत्रात डॉ. सुनील सावंत यांनी मुलाखतीची तयारी कशी करावी, याविषयी विवेचन केले. त्यानंतर प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रास्ताविक सुटाचे अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांनी केले. सुटाचे विश्वस्त प्रा. एस. जी. पाटील यांनीही प्राध्यापकांना संबोधित केले. सूत्रसंचालन डॉ. अरुण शिंदे यांनी केले. यावेळी सुटाचे समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील, प्रा. इला जोगी. प्रा. अरुण पाटील. प्रा. डी. आर. भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर