पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच प्रज्ञा जाधव, सुशील पाटील कौलवकर, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी उत्तम पाटील यांनी केले. यावेळी अरुण जाधव यांच्या फंडातून शाळा दुरुस्ती साठी तीन लाख रुपये, पांडुरंग भांदिगरे यांच्या फंडातून पेविंग ब्लॉकसाठी दोन लाख ८० हजार, पंचायत समिती सदस्य दीपाली पाटील यांच्या फंडातून दोन लाख ८० रुपये देण्यात आले. जीवन पाटील यांच्या फंडातून निधी देण्यात आला.
यावेळी दीपक पाटील, माजी सभापती दीपाली पाटील, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर, सुभाष जाधव, पंडित जाधव, रंगराव जाधव आदीसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.
०३ पिंपळवाडी विकासकामे
फोटो ओळी : पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथील विकास कामाचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, अरुण जाधव, सुशील पाटील, धैर्यशील पाटील, सरपंच प्रज्ञा जाधव व मान्यवर.