दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीकडील पिरकुरण रस्ता मुरमीकरण यासाठी जवाहर साखर कारखान्याकडून एक लाख वीस हजार, श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीकडून पन्नास हजार, तर त्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून एक लाख सत्तर हजार अशी एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये रकमेच्या रस्ता मुरमीकरण कामास जि.प. सदस्य राहुल आवाडे व गुरुदत्त एक्झिक्युटिव्ह संचालक राहुल घाटगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले.
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना नदीकडील कुरणातील गवत आणणे, मोटार सुरू करण्यास जाणे व कारखान्यास ऊस पाठविण्यास सोपे होणार असून, जवाहर व गुरुदत्त कारखान्याकडून अशा प्रकारची मदत झाल्याबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या दोन कारखान्याचा आदर्श सर्वच कारखान्यांनी घ्यावा. कारखान्यांनी राबविलेला उपक्रम हा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम असून, नदीकडील रस्त्याचेही मुरमीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
यावेळी दादासो सांगावे, विजय कुंभोजे, बबनराव चौगुले, सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नाना नेजे, रावसाहेब पाटील, अशोक पाटील, नरगोंडा पाटील, रावसो वठारे, देवेंद्र चौगुले, जिनपाल नेजे, बबन दानवाडे, रावसो मगदूम उपस्थित होते. तानाजी मोहिते यांनी आभार मानले.
फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी राहुल आवाडे, राहुल घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.