कोल्हापूर : येथील सावली फौंडेशनतर्फे वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत जात असून पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून फौंडेशनच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाची परवानगी घेऊन ज्ञान सावली उपक्रमअंतर्गत महानगरपालिकेच्या पाच शाळांच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. भविष्यात इतर शाळेतदेखील विविध उपक्रम व शाळेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात म्हणून रावबहादूर विचारे विद्यामंदिर, फुलेवाडी रिंगरोड या शाळेत शैक्षणिक साहित्य, लाईट, फॅन, पाण्याची टाकी देऊन बाथरूमची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच शाळेची कलात्मक चित्रांसह आकर्षक रंगरंगोटी करून देण्यात आली आहे. ही सर्व चित्रे कलाकार वेद वायचळ आणि आदित्य दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
महानगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, प्रत्येक भागातील गरजूंना याचा लाभ झाला पाहिजे, विद्यार्थी पट वाढला पाहिजे हाच संस्थेचा उद्देश असून त्यामुळेच हा उपक्रम हाती घेतला. लवकरच इतर शाळेतही रंगरंगोटी व इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
फोटो क्रमांक - ०४०४२०२१-कोल-सावली फाैंडेशन
ओळी - कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील रावबहादूर विचारे विद्यालयाची इमारत सावली फौंडेशनतर्फे रंगरंगोटी करून देण्यात आली.