शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

विधानसभेची रंगीत तालीम ... प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:17 IST

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले.

ठळक मुद्देअभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा अंतिम मतदार यादीत ३० लाख ९० हजार ६६० मतदारांची नोंद

कोल्हापूर : दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले.आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे ईव्हीएम (मतदान यंत्रे) व व्हीव्हीपॅटची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रथमस्तरीय तपासणी रविवारी पूर्ण झाली.

या ठिकाणी सकाळी ९ वाजता अभिरूप मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २२५ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एकूण २३० मतदान यंत्रांवर व व्हीव्हीपॅटवर ही प्रक्रिया सुरू राहिली. यामध्ये पहिल्या ९२ मतदान यंत्रांवर ५०० मतदान करण्यात आले. नंतर ९२ मतदान यंत्रांवर १००० मतदान व ४० मतदान यंत्रांवर मतदान करण्यात आले.

यानंतर झालेल्या मतांची खातरजमा करण्यासाठी व्हीव्हीपॅटमधील कागदी चिठ्ठ्याही पडताळण्यात आल्या. या ठिकाणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. या प्रक्रियेनंतर आता मतदान यंत्रांचे रॅँडमायझेशन (सरमिसळ) केले जाणार आहे. त्यानंतर ही यंत्रे विधानसभा मतदारसंघांमध्ये पाठविली जाणार आहेत.दरम्यान, रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यामध्ये मतदान केंद्रांची पाहणी केली आहे का? याची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर पुढील आठवड्यापासून होणाऱ्या व्हीव्हीपॅटसंदर्भातील जनजागृतीची तयारी करावी, निवडणुकीसाठी आवश्यक साहित्याची यादी तयार करावी, निवडणूक यंत्रणेचे आराखडे तयार करावेत, निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ३० लाख ९० हजार मतदारांची नोंदविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ३१ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये एकूण ३० लाख ९० हजार ६६० मतदारांची नोंद झाली आहे. त्यात चंदगड मतदारसंघात तीन लाख १८ हजार ९१३, राधानगरीत तीन लाख २५ हजार ५३८, कागलमध्ये तीन लाख २२ हजार ४६९, कोल्हापूर दक्षिणमध्ये तीन लाख २४ हजार ३६७, करवीरमध्ये तीन लाख ३१ हजार ७७, कोल्हापूर उत्तरमध्ये दोन लाख ८५ हजार ४४७, शाहूवाडीमध्ये दोन लाख ८७ हजार ४४७, हातकणंगलेमध्ये तीन लाख १७ हजार ६६८, इचलकरंजीमध्ये दोन लाख ९३ हजार २४३, शिरोळमध्ये तीन लाख १२ हजार ३९१ मतदारांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनvidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर