शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कोल्हापुरात रंगीबेरंगी पतंग महोत्सवास उत्साही सुरुवात, विदेशी पतंगांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:04 IST

बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या देशी-विदेशी पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात झाले.

ठळक मुद्देरंगीबेरंगी पतंग महोत्सवास उत्साही सुरुवात, विदेशी पतंगांसह देशी सुती मांजाचा समावेशबाबा राजे महाडिक पतंगप्रेमी, जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे आयोजन

कोल्हापूर : बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या देशी-विदेशी पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात झाले.यंदाच्या पतंग महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्पायडरमॅन, गरुड, मलेशियन क्रोबा, दुबईचे बटरफ्लाय, बीजींगचे घुबड, स्वित्झर्लंडचे विमान, हाँगकाँगचा रोबोट, मॉरिशसचे वटवाघळ... अशा एक ना अनेक आकारांच्या विदेशी पतंग व देशांतील विविध प्रांतांतील सुती मांजांच्या समावेश आहे.

या मांजांमध्ये सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली, बरेली, पुणे, बिहार, पाटणा, नाशिक, येवला, नाशिक, आदी ठिकाणचा सुती मांजाही प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व केमिस्टस असोसिएशन हा पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ५०० हून अधिक पतंग लहान मुलांना वाटण्यात आले; तर महालक्ष्मी धर्मशाळा, निवृत्ती चौक, तटाकडील तालीम मंडळ, पुन्हा धर्मशाळा अशी लहान मुलांची रॅली काढण्यात आली. यात विविध पतंगांचे नमुने घेऊन पतंगप्रेमी सहभागी झाले होते. बाबा महाडिक यांनी स्वागत केले.यावेळी जिल्हा केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, पृथ्वीराज पाटील, विजय अग्रवाल, ‘छावा’चे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, विजय करजगार, शिवानंद तोडकर, संजय करजगार, मुकुंद धर्माधिकारी, अवधूत अपराध, प्रकाश सरनाईक, भिकाजी निकम, सुरेश सूर्यवंशी, प्रवीण पुजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून बाबा महाडिक हे पतंगप्रेमींकरिता स्वखर्चाने पतंग वाटतात. यासह त्यांनी चीनी मांजा पतंगासाठी वापरू नये. त्यातून होणारे धोके, आदींबद्दल जनजागृती करण्यासाठी केवळ देशी प्रकारच्या मांजांचेही प्रदर्शन आयोजित केले आहे. याबद्दलची माहिती स्वत: महाडिक प्रदर्शन पाहण्यास आलेल्या पालक, मुले, नागरिकांना देत आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन पतंगप्रेमींना पाहता येणार आहे.

कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे भरविण्यात आलेल्या पतंग महोत्सवात देश-विदेशांतील पतंग बालचमूंनी असे न्याहाळले.

 

 

टॅग्स :kiteपतंगkolhapurकोल्हापूर