शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दोन मार्चपासून भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 12:42 IST

मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू होणार

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र दि. २४ जानेवारी संपले असून, महाविद्यालयांना सुटी सुरू झाली आहे. दुसरे सत्र दि. २ मार्च रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवसापासून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालये भरणार आहेत.कोरोना, ओमायक्रॉन वाढू लागल्याने शासनाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग दि. ७ जानेवारीपासून ऑनलाईन भरण्यास सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ऑफलाईन सुरू झाल्या. त्याच दिवशी शासनाने दि. १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी दिली. पण, विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक सत्र या वर्षी दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाले. हे सत्र दि. २४ जानेवारीला संपले.त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाविद्यालयांना सुटी सुरू झाली असून, ती १ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे शासनाने जरी वर्ग ऑफलाईन भरविण्यास परवानगी दिली असली, तरी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग प्रत्यक्षात दि. २ मार्चपासून भरणार आहेत. महाविद्यालयांतील वर्ग भरणार नसले, तरी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहेत. त्या दि. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.१८६०० विद्यार्थ्यांचे लसीकरण

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३३ अनुदानित महाविद्यालयांत या वर्षी एकूण ९८५८० विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. त्यांपैकी १८ वर्षांवरील एकूण १८६०० विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात १५३०५ विद्यार्थ्यांनी पहिला, तर ३२९५ विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कठरे यांनी दिली.

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून ऑनलाईन स्वरूपात सुरू होणार आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दि. २ मार्चपासून ऑफलाईन भरणार आहेत. - डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ