शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने घटले, पुराच्या पाण्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 16:12 IST

पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.

ठळक मुद्दे‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने घटले, पुराच्या पाण्याचा परिणामगगनबावडा, बाजार भोगाव परिसरात वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच, त्याशिवाय अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी राधानगरी, कडवी, कासारी, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे.पुराच्या पाण्याचा फटका सर्वच घटकांना बसत असून, ‘गोकुळ’च्या दूध संकलनावरही त्याचा परिणाम झाला आहे. गगनबावडा, धामणी खोरा व बाजार भोगाव परिसरातून होणारी दुधाची वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारभोगावजवळ कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने त्यापुढील सर्व मार्ग बंद झाले आहेत. तर लोंघे येथे पाणी आल्याने गगनबावड्यासह तळकोकणाचा संपर्क तुटला आहे.

गगनबावड्यात बल्ककुलर असला, तरी तिथे तीन वेळचे संकलनच होऊ शकते; त्यामुळे मंगळवारी (दि. ३0) रात्री व बुधवारी सकाळपासूनचे दूध संकलन ठप्प झाले आहे. बुधवारी ‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने कमी झाल्याची माहिती संघ प्रशासनाने दिली. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर