कोल्हापूर : शहरामध्ये शनिवारी झालेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. अभियानाचा हा १०१ वा रविवार होता. मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, स्वच्छतादूत अमित देशपांडे, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
शनिवारी ही मोहीम रंकाळा टॉवर परिसर, धैर्यप्रसाद हॉल ते सेवा रुग्णालय, एससीसी भवन ते सायबर चौक, कृषी विद्यापीठ ते शिवाजी विद्यापीठ मेनरोड परिसर येथे करण्यात आली. वृक्षप्रेमी संस्थेमार्फत पंचगंगा नदी परिसर, बुधवार पेठ, ट्रॅफिक ऑफिस, शुक्रवार पेठ, व्हिनस कॉर्नर रोड, हरिओमनगर, सानेगुरुजी वसाहत, शाहू रोड, कळंबा येथे प्लास्टिक व कचरा उठाव केला.
राजारामपुरी, टाकाळा परिसरातील उद्यानात झाडांच्या पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काम करण्यात आले. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, अमर पोवार, अक्षय कांबळे, सतीश कोरडे, प्रसाद भोपळे, सविता साळुंखे, तात्या गोवा वाला, विकास कोंडेकर, शैलेश टिकार, विशाल पाटील सदस्य उपस्थित होते.
स्वरा फौंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राजक्ता माजगांवकर, अमृता वास्कर, मानसी कांबळे, पियुष हुलस्वार, फैजान देसाई, डॉ. अविनाश शिंदे, धर्मराज पाडळकर उपस्थित होते. मोहिमेत महापालिकेच्या ११० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
यावेळी अभियंता आर. के. पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, नीलेश पोतदार, फैजान देसाई, शेखर वडणगेकर, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, शिवाजी शिंदे, मनोज लोट, ऋषिकेश सरनाईक, नंदकुमार पाटील उपस्थित होते.
(फोटो देत आहे)