शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या रस्त्याचा महामंडळाने केला पंचनामा

By admin | Updated: November 6, 2014 00:40 IST

अधिकारी धारेवर : रस्ते प्रकल्पाची किंमत ३२५ कोटी

कोल्हापूर : आयआरबीला किमान ३२५ कोटी रुपये देणे द्यावे लागेल, असे मूल्यांकन समितीच्या अहवालात म्हटल्याचे स्पष्ट झाल्याने आज, बुधवारी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. महामंडळाने फुलेवाडीतील खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्यांना पंचनामा करण्यास कृती समितीने भाग पाडले.प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील घरी कृती समितीचे कार्यकर्ते व महामंडळाचे अधिकारी यांची बैठक झाली. दोन वर्षांच्या आत रस्ता खचला, आतापर्यंत ३२ लोकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला, युटिलिटी शिफ्टिंग झालेले नाही, पावसाळ्यात रस्त्यांना डबक्याचे स्वरूप येते, अशा कामाबद्दल समाधानी नसल्याचे अहवाल का दिला नाही. महामंडळाने न्यायालयात ‘आयआरबी’ची तरफदारी केली, असा आरोप एन. डी. पाटील व समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. फुलेवाडी रस्ता खचितप्रकरणी पंचनामा करून ‘आयआरबी’वर महामंडळाने गुन्हा दाखल करावा. त्यानंतरच येथून आपली सुटका होईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी शिंदे यांनी महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. एन. डी. पाटील यांनीही प्रकल्पाबाबत महामंडळाच्या हलगर्जीपणाबाबत जाब विचारला. याबाबत लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.अधिकारी निरूत्तरमहामंडळाने श्री. कृष्णराव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २४ जुलै २०१४ ला शहराचा दौरा क रून प्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर आजअखेर या समितीचा अहवाल मागणी करूनही महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला नाही. कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीने प्रकल्पाची ३२५ कोटी रुपये किंमत ठरविल्याचे सांगितले. ७० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेले नाही, तरीही २२० कोटी रुपये प्रकल्पाचे ३२५ कोटी कसे झाले. युटिलिटी शिफ्टिंग व आयआरबीला महापालिकेच्या दिलेल्या जागेच्या किमतीचे काय ? असा सवाल प्रा. एन. डी. पाटील यांनी उपस्थित करताच महामंडळाचे अधिकारी निरूत्तर झाले.