शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आधीच नारळ भडकला; दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:16 IST

आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा

कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा फटका यंदा नारळाला बसला आहे. दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाला कीड लागल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे चढ्या दराने नारळ विकले जात आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.कोल्हापुरात तामिळनाडू आणि कर्नाटक येथून येणारी नारळाची आवक एकदम कमी झाली आहे, त्यामुळे किरकोळ नारळविक्रीचा दर २५ रुपयांवरून ३५ ते ४० रुपये नग झाला आहे. आवक घटल्यामुळे नारळाचे दर यंदा श्रावणापूर्वी दोन महिने आधीच वाढले आहेत. गौरी-गणपतीचा सण तोंडावर असून, या काळात हा दर वाढलेला असून दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे.सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नारळाची सुमारे ६० ते १०० टन आवक होते. यंदा ती गतवर्षीपेक्षा जास्त असली तरी मुळातच आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा आहे. कोकणातही रोज ५०० पोती नारळ कोल्हापुरातून जातो. घाऊक बाजारात नारळ ५ ते १५ रुपयांना मिळत होते. किंमतही १५ रुपयांपेक्षा जास्त वाढत नव्हती.याउलट, सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या नारळाची किमान किंमत ३० रुपये आणि मोठ्या म्हणजे जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कोठारी’ नारळाची किंमत आता बाजारात ६० ते ६५ रुपये झाली आहे. एका आठवड्यात नारळाच्या किमतीत प्रतिकिलो सात रुपयांनी वाढ झाली आहे.

आम्हांला जेवणात ओले खोबरे घालायला आवडते. नारळाचे दर वाढल्याने वापरावर मर्यादा आल्या आहेत. - सरिता जाधव, सोन्यामारुती चौक, कोल्हापूर. 

गेल्या काही वर्षांत किमती सातत्याने वाढत असल्या तरी, नारळाची किंमत अभूतपूर्व पातळीवर पोहोचल्या आहेत. याचा फटका सामान्य व्यक्तीला बसत आहे. - अविनाश नासिपुडे, नारळ व्यापारी, महापालिका चौक, कोल्हापूर.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा नारळाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने इतर राज्यांवरील भार वाढला आहे. त्याचा फटका नारळविक्रीवर झाला आहे.- निखिल बेंडके, नारळ व्यापारी, लक्ष्मीपुरी