शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

‘लोकमत’चा दणका : इचलकरंजी येथील कचरा उठाव करण्याची मागणी

इचलकरंजी : येथील कचऱ्याचा उठाव होत नसल्याची बातमी काल, सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतरही पालिकेची यंत्रणा जागी झाली नाही. याची दखल घेत आज, मंगळवारी येथील भारतीय जनता पक्षाच्यावतीने पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार व उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले यांना घेराव घालून धारेवर धरले. दोन दिवसांत शहरातील संपूर्ण कचरा उठावाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून नागरिकांना स्वच्छते संदर्भात प्रेरणा देण्याचे काम केले. देशभरामध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इचलकरंजीत याउलट परिस्थिती बनल्याचे दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, भरलेले कोंडाळे, तुंबलेल्या गटारी असे चित्र पाहावयास मिळत आहे. दैनिकांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही नगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, जिल्हा सरचिटणीस धोंडिराम जावळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना घेराव घातला. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रश्नांचा भडीमार करून चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडे जुजबी उत्तरे देण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, दोन दिवसांत कचरा उठाव करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात शहाजी भोसले, बाबासाहेब नलगे, दीपक पाटील, संतोष कोटगी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)कारणे दाखवा नोटिसाशहरातील कचरा उठाव होत नसल्याच्या कारणावरून आज, मंगळवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी अचानकपणे सकाळी शहरात फिरून वेळेवर कामासाठी उपस्थित नसणाऱ्या स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही भागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या.