शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

सहधर्मचारिणीचा यज्ञ- कोल्हापूर सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:05 IST

बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे

शिवशाहीर डॉ. राजू राऊत

बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे करणारे. कुतुहलापोटी अनेक क्षेत्रांतील अनेक गोष्टी समजून घेऊन त्यात अधिकाधिक भर टाकत त्या विकसित करणारे बाळकाका खरंतर ‘१२५ वर्षे मी जगणारच हो’ असे कित्येकदा पुढ्यात म्हणणारे पुढ्यातच गेले. खरंच, फारच लवकर.

अनेक कलांमधील नैपुण्याबरोबर कुतूहलापोटी घनिष्ट मैत्री असणारे मित्र डॉ. गजाननराव जाधव यांचे आॅपरेशन थिएटरमध्ये ते आॅपरेशन कसे होते? ते पाहायला गेले नि कटिंग ब्लेडमधील कमतरता लक्षात आली. घरी असणाºया दीड फुटी लेथवर पोलादी कास्ंिटग करून धारदार कटिंग ब्लेडस्पेक्षा फारच सुपीरिअर करणारे काका असे कसे अचानक गेले, हा विचार माझ्या बालमनावर कितीतरी वेळा टोचत राहिला.

वाशीनाक्यावरचे ते घर मुलांचे संसार, व्यवसायापोटी गावात. मुले, नातवंडे सुट्टीला आधीमधी येतच होती; पण त्या रंकाळ्याच्या काठावरील एरवी टुमदार आकर्षक दिसणाºया घरात राहिल्या त्यांच्या पत्नी शकुंतलाताई. एरवी जोडीनेच आनंदात आल्या-गेलेल्यांचे स्वागत, आदरातिथ्य करीत. सदैव हसतमुखाने काकांच्याबरोबर घरकाम करीत. त्यांच्या प्रत्येक कामात हात मिळवत. मग, ते पेंटिंग, मोल्डिंग ते इतर सर्व छंद. ज्या सदैव हसतमुखाने काम करीत त्याच ताई पूर्णपणे त्या घरात एकट्या पडल्या; पण चेहºयावरचे हास्य लोप पावले नव्हते.मुला-बाळांचीही तक्रार नव्हती. गरजाही फार नव्हत्या; पण वेळ जाणे नि अर्थार्जनासाठी पतीकडून मिळालेल्या थोड्याफार अनुभवातून पेंटिंग सुरू केले. आपल्या पतीच्या संबंधित व शहरातील बड्या लोकांच्या पोट्रेटस्च्या आॅर्डर मिळवून कामे करीत.

तसे बºयापैकी कौशल्य त्यांनी प्राप्त केले होते. त्या स्वत: नेटाने बºयापैकी काम करीत. अगदीच काही अडले तर मॉर्निंग वॉकला रवींद्र मेस्त्री (दादा), कधी कधी चांगदेव शिगावकर, तर कधी माझे वडील कृ. दा. राऊत हे फायनल टचेस देऊन आॅर्डर पूर्ण करून कामाला हातभार लावत. जेणेकरून त्या जागेचे रंग, ब्रशचे नाते तरी तार्इंनी अखंड ठेवले होते. पुढे जवळपास १२-१३ वर्षे हे काम त्यांनी नेटाने सहधर्मचारिणी या नात्याने कोल्हापूरच्या कला परंपरेत पाय रोवून खंबीरपणे केले हेच मोठे कौतुक.

१९९१ साली मात्र वाशीनाक्यावरील रंकाळ्यातल्या त्या ऐतिहासिक घरात एका काळरात्री ताईची अज्ञातांकडून निर्घृण हत्या झाली. तपास आजवर लागला नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट. मग मात्र छत्रपतींनी कलासंवर्धनासाठी दिलेल्या या जागेतील कलासंबंधच तुटला. कुटुंबीयांचेही प्रापंचिक व्यापातून जाणे-येणे कमी होत गेले. काकांचा स्टुडिओ जुगाराचा अड्डा बनला. तळीराम व जुगारडे यांचा ठिय्या रात्रंदिवस पाने कुटत बसायचा. आत मोठमोठी कर्तबगार लोकांची शिल्पे शांतपणे वेळेचा हा ‘डाव’ बघत शांत, निश्चय, निर्विकार पाहत होती. एकदा मी माझे पत्रकार मित्र उदय कुलकर्णी यांना घेऊन नजरेखाली घातले व मी, उदय कुलकर्णी, उदय गायकवाड, राजू पाटील व पोवाड्यातील सर्व सहकारी मिळून तिथले फोटो काढून तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ऐतिहासिक पुरुषांच्या शिल्पांची दुरवस्था थांबवावी, अशी विनंती केली किंवा कुटुंबीयांचे हवाली करा, अशी सूचनाही केली. नंतर ती कुटुंबीयांच्या हवाली केली. परत कुठे काय नि कसे घडले समजले नाही.

पश्चिमेला शालिनी पॅलेस व पूर्वेला बाळ चव्हाण यांचा स्टुडिओ ही दोन्ही रंकाळ्याच्या दोन्ही बाजंूवरील पे्रक्षणीय स्थळे. येता-जाता नेहमी मान वळविली की, ‘बाळ चव्हाण कलामंदिर व मत्स्यालय’ अशी अक्षरे असणारा त्या घराच्या भिंतीवरील तांबड्या अक्षरातील बोर्डही दिसायचा. दरम्यान, रंकाळा परिसर सुशोभीकरण योजना सुरू झाली. घराशेजारच्या खणी स्वच्छ केल्या गेल्या नि एकेदिवशी तिकडून जाताना ते बाळ चव्हाण यांचे घर दिसलेच नाही. अरे! फक्त उरले होते ते घराशेजारील चिंचेचे झाड आणि घराच्या जागेवरून एखाद्या कालसर्पासारखा मोठे वळण घेणारा पदपथाचा रस्ता.कलेचे माहेरघर म्हणतात या कोल्हापूरला; पण हे असं काही आठवलं की, हे नक्कीच वाटतंय कलेचे माहेर कलाकारांचं सासर...(लेखक कोल्हापुरातील नामवंत आर्टिस्ट आहेत.)kollokmatpratisad@gmail.com

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLife Imprisonmentजन्मठेप