शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी,

ठळक मुद्देहंगामाबाबत सरकार-कारखानदारांनी ठरवावेमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत ‘एफआरपी अधिक दोनशे रुपये’ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, बाजारातील साखरेचे दर व बँकांकडून मिळणारी उचल यामध्ये तफावत असल्याने संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकºयांना दर देऊ शकत नाही, अशी भूमिका घेत बुधवारपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कारखानदारांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकार व कारखानदारांनी काय ते ठरवावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात येऊन ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये उसाचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये करतो, निर्यात साखरेबाबत बँक, केंद्र सरकार व कारखाने यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार व राज्य सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या घोषणा फडणवीस यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच केल्या असणार यात माझ्या मनात शंका नाही. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. कारखान्यांनी हंगाम बंद करून कोणाची कोंडी केली हे मला माहिती नाही, हंगामाबाबत सरकार व कारखानदारांनी ठरवावे पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाहीएफआरपी अधिक २00 रुपये घेतल्याशिवाय ‘स्वाभिमानी’मागे हटणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान,बुधवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद ठेवले. ‘शाहू’चे सुमारे ८०० टन, तर ‘वारणा’चे ४०० टन ऊस ‘राजाराम’ कारखान्यात आणून गाळप केल्याचे समजते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर