शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

‘सीपीआर’मधील परिचारिकांचा बेमुदत बंद

By admin | Updated: August 4, 2015 00:34 IST

आरोग्यसेवेवर जाणवला परिणाम : महिन्याच्या एक तारखेला पगार, सेवानिवृत्त परिचारिकांना आर्थिक लाभ देण्याची मागणी

कोल्हापूर : परिचारिकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस व्हावेत, सेवानिवृत्त झालेल्या परिचारिकांना सर्व आर्थिक लाभ मिळावेत, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मधील परिचारिकांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे आरोग्यसेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकीत (मे २०१५ पासून) आहेत. याबाबत महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अनेक वर्षांपासून सीपीआरमधील परिचारिकांचे पगार शासन निर्णय असूनदेखील महिन्याच्या एक तारखेला होत नाहीत. पगाराच्या स्लिप दिल्या जात नाहीत. पगार स्लिप मागितली असता पगार स्लिप देण्यासाठी कागद उपलब्ध नाही, असे कार्यालयाकडून सांगितले जाते. दरम्यान, परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर शाखेने महाविद्यालय प्रशासन व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांना या बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत महिन्यापूर्वी निवेदन पाठविले होते.त्यानुसार सीपीआरमधील परिचारिका महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी एकत्र जमल्या. त्यानंतर कोल्हापूर शाखेच्या जिल्हाध्यक्षा हाश्मत हावेरी यांच्या नेतृत्वाखाली परिचारिकांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांची भेट घेतली. यावेळी हावेरी यांनी सर्व परिचारिकांचा पगार एक तारखेला व्हावा, पगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे प्रशासनाने महिन्याचा पगार एक तारखेलाच करावा, अशी मागणी केली. त्यावर थोरात यांनी, मनुष्यबळ कमी असल्याने पगाराला विलंब होत आहे. यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. दरम्यान, सीपीआरमधील नवजात अतिदक्षता बालक विभाग, प्रसूती विभाग, अपघात विभागामध्ये परिचारिका बसून होत्या. त्यामुळे शिकावू परिचारिका, डॉक्टर आरोग्यसेवेचे काम करत होते.आंदोलनात ज्ञानेश्वर मुठे, संदीप नलवडे, मनोज चव्हाण, संजीवनी दळवी, सुजाता उरुणकर, श्रीमंती पाटील, स्वाती क्षीरसागर, प्रियंका पोवार, पुष्पा गायकवाड, शामल पुजारी यांच्यासह परिचारिकांचा सहभाग होता.सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघाचा पाठिंबासीपीआरमधील परिचारिकांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. अध्यक्ष वसंत डावरे, सरचिटणीस अनिल लवेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये सकाळी परिचारिकांना भेट दिली.आरोग्य यंत्रणा कोलमडू नये, यासाठी २० ते २५ शिकाऊ डॉक्टर व परिचारिकांना नेमण्यात आले आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे.- डॉ. रघुजी थोरात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर