शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:17 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देशाहू समाधीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीत गोंधळजिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात गदारोळ

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.राजर्षी शाहू समाधीस्थळाचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे. संरक्षक भिंतीचे काम सुरूअसताना सिद्धार्थनगरातील काही नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलला लागून एक प्रवेशद्वार करावे यासह अन्य काही मागण्या करत हे काम बंद पाडले, तर शाहू महाराज यांच्या समाधीचे काम असल्यामुळे यात कोणी आडवे पडू नये, अशी भूमिका महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे काम बंद आहे.याप्रश्नी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह कोल्हापुरातील शाहू भक्तांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. परंतु दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोठा गदारोळ झाला.आम्ही शाहू -फुले-आंबेडकरांचा वारसा चालविणारे कोल्हापूरकर आहोत; त्यामुळे दोन जातींत तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राजर्षी शाहू महाराज यांनी स्वत: आपली समाधी दलित समाजाच्या वसाहतीशेजारी असावी, असे सांगितले होते; त्यामुळेच ही समाधी नर्सरी बागेत होत आहे.येथे शाहू महाराज यांचे वडील चौथे शिवाजी, मातोश्री आनंदीबाई यांची समाधी तर पुत्र प्रिन्स शिवाजी व करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांची मंदिरे तेथे आहेत. यापूर्वी ताराराणींची संगमरवरी दगडाची मूर्ती कोणी अज्ञाताने फोडली आहे; त्यामुळे हा परिसर सुरक्षित राहिलेला नाही. म्हणूनच संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे देसाई यांनी सांगितले.

दोनवेळा संबंधित नागरिकांशी चर्चाही केली; परंतु काही मोजके लोक हटवादी भूमिका सोडायला तयार नाहीत; त्यामुळे अन्य पदाधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात येत आहे. संरक्षक भिंतीचे काम २६ जून या शाहू महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर