शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 19:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले.

ठळक मुद्देकोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरणकाही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले.गेल्या आठवड्यात रोज पाऊस कोसळत होता. रविवारपासून पाऊस कमी असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. काही तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात मात्र दिवसभर आकाश गच्च होते. दुपारनंतर वाऱ्याची झुलूक जाणवू लागली. त्याचबरोबर भुरभुरही सुरू होती.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यास सरासरी ४.३३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २०.५० मिली मीटर पाऊस झाला.

धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे, तुरळक सरी कोसळत असल्याने राधानगरी धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद १२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात एका खासगी मालमत्तेची किरकोळ पडझड होऊन सुमारे तीन हजाराचे नुकसान झाले. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने अद्याप या मार्गावरील वाहतूक बंद आहे.आज, मंगळवारपासून दोन दिवस सकाळी काही काळ ऊन पडले. मात्र, त्यानंतर दुपारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर