शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Diwali -कपडे, पणत्या, आकाशकंदील, दिवाळीसाठी बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:23 IST

अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.

ठळक मुद्देकपडे, पणत्या, आकाशकंदील, दिवाळीसाठी बाजारपेठ सजलीग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना बाजारात

कोल्हापूर : अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर खर्चाला कात्री लावून प्रत्येकजण या सणासाठी पैसे जमवत असतो. भिशी, रिकरिंग, बोनस या माध्यमांतून येणारा पैसा सणासाठी आणि आनंदासाठी खर्च केला जातो. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली, तिची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत असली तरी सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. दिवाळी महिनाअखेरीस असल्याने नोकरदारांकडून पगार झाल्या-झाल्याच सणाची खरेदी सुरू आहे.सणाची पहिली खरेदी होते ती कपड्यांनी. महाद्वार रोडवरील फिरत्या व्यावसायिकांपासून ते शोरूमपर्यंत सगळ्यांकडेच फॅशनेबल कपड्यांचे नवीन कलेक्शन आल्याने सध्या सर्वांत मोठा ग्राहकवर्ग आहे तो कपडेखरेदीला.

कोल्हापूरची अख्खी बाजारपेठ ज्या ठिकाणी एकवटली आहे, तो महाद्वार रोड आणि राजारामपुरीचा परिसर सायंकाळी कपडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच्या कपड्यांची खरेदी कुटुंबीयांकडून सुरू आहे.याशिवाय रंगीबेरंगी रांगोळ्या, आकर्षक पणत्या, दिवे, तोरण, लटकते तोरण, आकाशकंदील, पर्स, बॅगा, रांगोळीचे छाप, चप्पल अशा अनेकविध साहित्याने महाद्वार रोड भरून गेला आहे.सूट, भेटवस्तू, योजनांचे आकर्षणमंदी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच व्यावसायिकांकडून खरेदीवर २० ते ५० टक्क्यांपर्यंतची सूट, आकर्षक भेटवस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आॅफर्स देण्यात येत आहेत. एका कपड्याच्या खरेदीवर दोन कपडे मोफत, विशिष्ट रकमेच्या वस्तूवर तेवढ्याच किमतीची वस्तू मोफत, गिफ्ट व्हाउचर, सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत सूट अशा विविध योजनांनी ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.फराळाची आॅर्डरदिवाळी म्हणजे फराळ... हा रुचकर फराळ बनविण्यासाठी महिलांना किमान चार-पाच दिवस स्वयंपाकघरातच काढावे लागतात. साहित्याच्या खरेदीपासून प्राथमिक तयारी ते प्रत्येक पदार्थ बनवेपर्यंत व त्यानंतरची स्वच्छता या सगळ्या रहाटगाडग्याला दूर सारत महिलांनी, विशेषत: नोकरदार महिलांनी तयार फराळाला प्राधान्य दिले आहे. हा फराळ बनविणाºया महिला संस्थांकडून आॅर्डर घेण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर