शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केएमटीच्या २४ बसेस सुट्या भागांअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:22 IST

के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सुट्या भागांअभावी बसेस बंद ठेवण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याबद्दल बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ​​​​​​​

ठळक मुद्देकेएमटीच्या २४ बसेस सुट्या भागांअभावी बंदआठ दिवसांत बसेस दुरुस्त करा : महापौर

कोल्हापूर : के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सुट्या भागांअभावी बसेस बंद ठेवण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याबद्दल बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.सुट्या भागांअभावी २४ बसेस बंद आहेत. तसेच ठोक मानधनावरील चालक, वाहक कामावर येत नसल्याने काही बसेस बंद ठेवाव्या लागतात. मोठ्या संख्येने बसेस बंद राहत असल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून महापौर लाटकर यांनी सुट्या भागांअभावी बंद असलेल्या बसेस आठ दिवसांत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना दिल्या.ठोक मानधन तत्त्वावर देण्यात येत असलेला १० हजार रुपये पगार हा कमी असल्याने कर्मचारी कामावर येत नाहीत; तसेच केव्हाही काम सोडून जात आहेत. त्यांचा पगार शासन निर्णयाप्रमाणे १४ हजार ५०० रुपये करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.के. एम. टी.कडील कर्मचाऱ्यांवर दैनंदिन वेतनावर एक लाख ५६ हजार रुपये खर्च होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे संचित देणे द्यावयाचे असून ते देण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. के.एम.टी कडे ११ ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. त्यांपैकी आठ पार्किंग सुरू असून तीन ठिकाणच्या पार्किंगचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. इतर पार्किंगच्या ठिकाणी कर्मचारी पगारावरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे, अशीही माहिती समोर आली.गाडीअड्डा येथील जागेत के.एम.टी. विभागाने पार्किंग सुरू करावे, रेल्वे स्टेशन येथे रेल्वे येण्याच्या वेळेत आपला कर्मचारी ठेवून तेथे बस सुरू करावी, ग्रामीण भागातील रिक्षांना लोकेशन्स ठरवून दिलेली आहेत; त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी, जाहिरातीतून उत्पन्न वाढवावे, शासनाकडे निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या.यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, वर्क्स मॅनेजर प्रतापराव भोसले, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, कामगार अधिकारी संजय इनामदार, संजय मोरे, दीपक दुर्गुळे, सुरेश माने, दिनेश सोमण, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर