शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी शालेय विद्याथी सरसावले, १४ टन कचरा, प्लास्टिक उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:02 IST

कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला.

ठळक मुद्देस्वच्छतेसाठी शालेय विद्याथी सरसावले१४ टन कचरा, प्लास्टिक उठाव

कोल्हापूर : महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला. मोहिमेचा चौतिसावा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, शाहू दयानंद हायस्कूल, नेहरूनगर विद्यालय, सुभाषनगर विद्यालय, वीर कक्कया विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, नेहरूनगर परिसरांतील स्थानिक नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.महापालिकेच्या वतीने दर रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. रविवारी मोहिमेला मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. त्यांनी झोकून देऊन परिसराची स्वच्छता केली. यावेळी गटनेता सुनील पाटील, अरुण बारामते, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, लेखापाल बाबा साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सर्व आरोग्य निरीक्षक व नागरिक उपस्थित होते.स्वच्छ केलेला परिसरकळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह मुख्य रस्ता, यलम्मा मंदिराचा परिसर, रिलायन्स मॉलचा संपूर्ण परिसर, दसरा चौक ते खानविलकर पंप, संप आणि पंप हाऊस, माळकर तिकटी ते शिवाजी मार्केट, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, शाहू नाका ते उड्डाणपूल टेंबलाई नाका, कोटीतीर्थ तलाव, डीएसपी आॅफिस ते भगवा चौक मुख्य रस्ता.महापालिकेची यंत्रणा

  • ४ जेसीबी,
  • ८ डंपर,
  • ६ आरसी गाड्या,
  • ५ टिपर,
  • १ पाणी टँकर 
  • महापालिकेच्या ९० स्वच्छता कर्मचारी.प्लास्टिक कचरा झाला कमीगेल्या सात महिन्यांपासून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक रविवारी स्वच्छ मोहीम घेतली जाते. मोहिमेमध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. नागरिकांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रारंभी १०० टनांपर्यंत कचरा संकलित होत होता. आता केवळ १५ टन कचरा संकलित होत आहे. ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या यात्रेत नागरिकांची या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
  •  

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर