शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लेह-लडाखमध्ये कोल्हापूरच्या तरुणांची स्वच्छता मोहीम, पक्ष्यांसाठी घरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:02 IST

कोल्हापूर : नैसर्गिक व भौगोलिक सौंदर्याने लाखो पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या लेह- लडाख परिसरातील दऱ्याखोऱ्यांत पर्यटकांनी टाकलेला कचरा उचलून कोल्हापुरातील ...

ठळक मुद्देलेह-लडाखमध्ये कोल्हापूरच्या तरुणांची स्वच्छता मोहीमदि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडियातर्फे पक्ष्यांसाठी घरटी

कोल्हापूर : नैसर्गिक व भौगोलिक सौंदर्याने लाखो पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या लेह-लडाख परिसरातील दऱ्याखोऱ्यांत पर्यटकांनी टाकलेला कचरा उचलून कोल्हापुरातील तरुणांनी अभ्यासदौऱ्याच्या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविली. इतकेच नव्हे तर दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडिया या संस्थेचे पदाधिकारी असलेल्या या तरुणांनी फौंडेशनतर्फे या परिसरातील पक्ष्यांसाठी त्या भागात घरटी लावून देण्याची मोहीमही राबविली.‘थ्री इडियट’ सिनेमानंतर लेह-लडाख परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कैकपटींनी वाढली आहे. देशभरातूनच नव्हे तर परदेशांतूनही लाखोंच्या संख्येने बायकर्स येथे येत असल्याने नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागात बऱ्याच पर्यटकांकडून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच इतर कचरा फेकला जात आहे. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला आहे.

जम्मू आणि काश्मीर येथील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे व कारगीलचे जिल्हाधिकारी बशीर चौधरी यांंच्याशी फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात चर्चा करून फौंडेशनतर्फे ‘पक्ष्यांसाठी घरटे’ ही मोहीम राबविली. काश्मीर व लेह-लडाख येथे प्रचंड थंडी असूनसुद्धा चिमण्या व इतर लहान पक्षी फार मोठ्या प्रमाणावर आहेत.

या लहान पक्ष्यांसाठी बांबूपासून बनविलेल्या नैसर्गिक घरट्यांमुळे अधिवास मिळेल, असा विश्वास त्या दोघांनी व्यक्त करून दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे, पदाधिकारी विश्वजित सावंत, अ‍ॅड. धैर्यशील पवार, रोहन राशिंगकर व शार्दूल गरगटे यांनी राबविलेल्या या मोहिमेचे कौतुक केले.

भविष्यात जम्मू आणि काश्मीर प्रशासन व दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडियामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी ग्वाही दिली. लेहमधील स्थानिक सामाजिक संस्थेने या कार्याबद्दल ‘दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडिया’च्या या उपक्रमांचे कौतुक केले व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले.

 

 

टॅग्स :ladakhलडाखkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान