शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

दहावीची परीक्षा : वडूथमध्ये तोतया परीक्षार्थीला पकडले, पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 14:26 IST

दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ  (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा सुरूवडूथमध्ये तोतया परीक्षार्थीला पकडलेपहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद

कोल्हापूर : शालेय शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. १) पासून सुरुवात झाली. सूचना आणि शुभेच्छा स्वीकारात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मराठीचा पहिला पेपर दिला.

पहिल्याच पेपरला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ  (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले.

शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय मंडळातर्फे कोल्हापूर विभागात ही परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी कोल्हापूर विभागातून १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे. मराठीच्या पहिल्या पेपरसाठी गुुरूवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थीनींची गर्दी होवू लागली. पालक आपल्या पाल्यांचे बैठक क्रमांक शोधून देत होते. त्यासह पेपर सोडविण्याबाबत विविध सूचना ते करीत होते.परीक्षार्थींना त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. परीक्षार्थींना पेपरच्या अर्ध्या तासापूर्वी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी अकरा वाजता मराठीचा पेपर सुरू झाला. अनेक पालक पेपर सुटेपर्यंत केंद्राबाहेर थांबून होते. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता. कोल्हापूर विभागातील विविध परीक्षा केंद्रांना भरारी पथकांनी अचानकपणे भेटी दिल्या.

शहरातील काही केंद्रांवर पेपर सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर काहीवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने वडूथ येथील परीक्षा केंद्रावर तोतया परीक्षार्थीला पकडले.

वळीवडे केंद्राअंतर्गत असलेल्या शिरोली पुलाची येथील परीक्षा केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणारा परीक्षार्थी सापडला. त्यांच्या शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी सांगितले.

केंद्राच्या परिसरात उजळणीकेंद्राबाहेरील परिसरात परीक्षार्थी हे नोटस्वर  शेवटची नजर टाकत होते. यातील काहीजणांनी चर्चेतून उजळणीला प्राधान्य दिले, काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून काही मुद्दे समजून घेतले. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद अनेक परीक्षार्थींच्या चेहऱ्यांवर दिसून आला.

पेपर सुटल्यानंतर होळीची तयारीदहावीला पाल्य असलेल्या पालकांनी गुरुवारी होळीची तयारी ही पेपर सुटल्यानंतर केली. गांधीनगरसह अन्य परिसरात पेपर सुटल्यानंतर पुढील पेपरच्या तयारीचे भान ठेवत परीक्षार्थींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत होळीचा आनंद लुटला. 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर