शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सुविधा केंद्रे शनिवार-रविवारीही सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महापालिकेची देय असलेली संपूर्ण घरफाळ्याची रक्कम ३० जून २०२१ पूर्वी भरल्यास एकूण बिलात सहा टक्के सूट देण्यात ...

कोल्हापूर : महापालिकेची देय असलेली संपूर्ण घरफाळ्याची रक्कम ३० जून २०२१ पूर्वी भरल्यास एकूण बिलात सहा टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या सहाही नागरी सुविधा केंद्रावर मिळकतधारकांची गर्दी होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. यासाठी सर्व केंद्रे शनिवारी, रविवारी सुट्टी‍ दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे, आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळकत कराची देयके अपलोड करण्यात आलेली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे प्रिटिंगसाठी कागद वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि छपाईस विलंब होत असल्याने करदात्यांना वेळेत घरपोच बिले उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटवर आपला करदाता क्रमांक टाकून बिल पाहावे. नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांनी मागील वर्षाचे प्राप्त बिल सोबत नागरी सुविधा केंद्रात आणावे. आपला करदाता क्रमांक सांगितल्यास तत्काळ आपल्याला आपला चालू वर्षाची घरफाळ्याची रक्कम समजू शकेल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून आपला घरफाळा भरावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

चौकट

३ कोटी ८८ लाख जमा

सर्व नागरी सुविधा केंद्रमध्ये २ कोटी ९२ लाख ६४ हजार ७० तर ऑनलाइन ९५ लाख ८७ हजार ५४७ असे एकूण ३ कोटी ८८ लाख ५१ हजार ६१७ रुपये घरफाळ्याची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. सवलत योजना ३० जूनपर्यंत असल्याने पुन्हा तिजोरीत घरफाळ्याच्या रकमेची भर पडणार आहे.