शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात तिन ठिकाणी घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:20 IST

दिवाळी सणाच्या धामधुमीत चोरट्यांनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला. मुंबई पोलीसाच्या फुलेवाडी रिंगरोडवरील राहत्या घरासह तिन्ह ठिकाणी घरफोड्या करुन सोळा तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे गुरुवारी (दि. ८) उघडकीस आले. वाढत्या घरफोड्यांनी पोलीसांची तारांबळ उडाली असून नागरिकांत भिती पसरली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात तिन ठिकाणी घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपासदिवाळीत चोरट्यांचे पोलीसांना आव्हान

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या धामधुमीत चोरट्यांनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला. मुंबई पोलीसाच्या फुलेवाडी रिंगरोडवरील राहत्या घरासह तिन्ह ठिकाणी घरफोड्या करुन सोळा तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे गुरुवारी (दि. ८) उघडकीस आले. वाढत्या घरफोड्यांनी पोलीसांची तारांबळ उडाली असून नागरिकांत भिती पसरली आहे.अधिक माहिती अशी, अरिहंत रेसिडेन्सी, क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे रविराज रघुनाथ चौगले (३०) हे कुटूंबासह राहतात. ते मुंबई पोलीस दलात नोकरीस आहेत. दिवाळी निमित्त ते पत्नी शर्वरी असे दोघेजण घराला कुलूप लावून किरकोळ साहित्य आणणेसाठी बाजारात गेल्या होत्या.

खरेदी करुन परत आले असता घराच्या मुख दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चार तोळे सोन्याचे दागिने व चार हजार रुपये चोरट्याने चोरुन नेलेचे निदर्शनास आले. शिवराज हेमंतराव मोहिते (वय ३५) हे यशोदा बंगलो शिवाजी पार्क येथे राहण्यास आहेत.

ते दिवाळी सुट्टीला आपले गावी रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड , जि. सातारा) येथे कुटूंबासह गेले होते. त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी बेडरुममधील तिजोरीतील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यामध्ये चेन, अंगठी, लॉकेट, बदाम यांचा समावेश होता.रुईकर कॉलनी येथे अमितकुमार सुनिलकुमार वाडेकर (४२) हे कुटूंबासह राहतात. त्यांच्या घराचे हॉलमधील लोखंडी खिडकीचे गज वाकवुन बेडरुममधील सात तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यामध्ये गंठण, चेन, बांगडी, हिऱ्याची अंगठी, कानातले टॉप्स होते. याप्रकरणी करवीर आणि शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दिवाळी सणामध्ये चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर