इचलकरंजी : शहरातील मुख्य मार्गांवर सुरू असलेले पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रत्यय खुद्द नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना आला. त्यामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी संबंधित मक्तेदारांना फैलावर घेतले आणि रस्ता पॅचवर्क कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना दिल्या.येथील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर छोटे-मोठे खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांबरोबर पादचाऱ्यांनाही होत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या त्रासातही भर पडली. अशा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पॅचवर्क करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. त्याची ७० लाख रुपयांची कामे वेगवेगळ्या पाच मक्तेदारांना दिली आहेत.पॅचवर्क करताना कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याच्या सूचना नगराध्यक्षांसह सत्तारूढ पक्षाने मक्तेदारांना दिल्या होत्या. सोमवार (दि. २४)पासून शहरात पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल संबंधित परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नगराध्यक्षा बिरंजे यांनी डॉ. आंबेडकर चौक व संभाजी चौक अशा दोन्ही ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पॅचवर्क करताना डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून आले. परिणामी, संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी संबंधित मक्तेदारांना बोलावून चांगले फैलावर घेतले. प्रत्येक कामावर मक्तेदाराने जातीने थांबून पॅचवर्क दर्जेदार होईल, याची खबरदारी घ्यावी, असे सुनावले.मक्तेदारांची स्टेशन रोडकडे धावनगराध्यक्षांनी खडसावल्यानंतर मतक्तेदारांची बैठक झाली. बैठकीनंतर काहीजणांनी स्टेशन रोडवर असलेल्या काट्याच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, बोगसगिरीमुळे चटावलेल्या काही मक्तेदारांना आदर्श नमुन्याप्रमाणे प्रत्यक्ष काम झाले पाहिजे, अशा सूचना अभियंत्यांनी दिल्याने मक्तेदाराम्ांध्ये तणाव निर्माण झाल्याचेही समजते.
नगराध्यक्षांनी मक्तेदारांना सुनावल
By admin | Updated: December 1, 2014 00:00 IST