शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेंडापार्कातील ७५ एकर जागेत कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 16:51 IST

कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा मुक्रर करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीमुळे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन १00 कोटींची तरतूद करणार

कोल्हापूर : कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा मुक्रर करण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरातील सर्किट बेंचसंदर्भात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर फडणवीस यांनी सर्किट बेंचच्या निर्मितीला मान्यता दिली.मुंबई उच्च न्यायालयात नवीन मुख्य न्यायाधीश हजर झाल्यानंतर त्यांची भेट घेवून हे सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी शासन तयार असल्याबाबत तसेच हे बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाने मागणी केलेले पत्र त्वरित देतो असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.फडणवीस यांनी यावेळी कोल्हापूरातील या प्रस्तावित सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्याबाबत विधी व न्याय खात्याच्या सचिवांना आदेश दिले. या सर्कीट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांनी ११२0 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी येत्या अर्थसंकल्पात १00 कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याचे आश्वासनही बुधवारी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले.मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात बुधवारी कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्कीट बेंच कोल्हापूरातच व्हावे अशीच शासनाची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.या शिष्टमंडळात सर्वपक्षीय नागरी खंडपीठ समिती आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक प्रशांत शिंदे, सेक्रेटरी किरण पाटील, सातारा व सांगली बार असोशिएनचे पदाधिकारी, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे माजी चेअरमन महादेवराव आडगुळे, बार असोचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, माजी सेक्रेटरी व्ही. आर. पाटील तसेच खंडपीठ नागरी कृती समितीचे बाबा पार्टे आणि जयकुमार शिंदे तसेच करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCourtन्यायालयkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील