शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:26 IST

पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देकबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीलामंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळे मदतीला; पायाभरणी

कोल्हापूर : पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेच्या परिसरात कबुरे यांचा दगडी वाडा दिमाखात उभा होता. तीन मजली इमारत या कुटुंबीयांची शान होती. तब्बल आठ खोल्या असलेला हा वाडा ८ दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने जमीनदोस्त झाला. शुक्रवार पेठेतील हे कुटुंब बेघर झाले. यात सरकारी पंचनामे झाले. अत्यल्प अनुदानही मिळाले.यासोबतच धनंजय महाडिक युवाशक्तीने संसार सेट, तर प्रायव्हेट हायस्कूलच्या एका गु्रपने धनादेश देत मदत दिली. तरीही हे घर उभारणे अशक्य होते; त्यासाठी पुन्हा धाऊन आली कोल्हापूरकरांची माणुसकी. यात मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निरीक्षण केले. त्यांनी कबुरे कुटुंबीयांना पहिली मदत देण्याचा निर्धार केला.

त्यानुसार पैशांची जुळवाजुळव करीत नऊ लाख रुपयांचे तीन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्धार केला. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करीत, घर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, राजू भोसले, रमेश पोवार, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.कबुरे कुटुंबीय पुन्हा सावरणारसीमा कबुरे यांचे पती जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून चिपळूण येथे कार्यरत होते. १९९६ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत सात वर्षीय प्रिती व पाच वर्षीय स्वाती या दोन मुलींवरही आभाळ कोसळले. त्यातून सावरून सीमा यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी प्रिती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर २०१९ आॅगस्टमध्ये तीन मजली वाडाच पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाल्याने पुन्हा दुसरा घाला नियतीने घातला. पुन्हा आपले घर होत नाही. या चिंतेने मायलेकींनी धास्ती घेतली होती; मात्र त्यातून सावरण्यासाठी मंगळवार पेठेतील अनेक मंडळे व तालीम संस्था मदतीसाठी दत्त म्हणून पुन्हा उभ्या राहत आहेत. पुन्हा तीन खोल्यांचे घर लवकरच उभे राहणार आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर