शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘चौंडेश्वरी’ पुण्याच्या जनता बॅँकेत विलीन

By admin | Updated: June 6, 2016 01:11 IST

सहकार खात्याची मंजुरी : सातही शाखांमध्ये ‘जनता’चे व्यवस्थापक आज रूजू होणार

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बँक पुणेस्थित जनता सहकारी बँकेत विलीन करण्यास सहकार खात्याने मंजुरी दिली आहे. बॅँक विलीनीकरणासाठी ४ जुलै ही तारीख देण्यात आली असली तरी आज, सोमवारी चौंडेश्वरी बँकेच्या सातही शाखांकडे व्यवस्थापक रूजू होत असल्याचे जनता बॅँकेने ‘चौंडेश्वरी’ला कळविले आहे.देवांग कोष्टी समाजाची चौंडेश्वरी बॅँक समजली जात असून या बॅँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली व सातारा असे तीन जिल्ह्यांत आहे. एकूण सात शाखांमार्फत बॅँक कार्यरत आहे. बॅँकेवर साधारणत: दोन वर्षांपूर्वी आर्थिक निर्बंध लावण्यात आले, त्यावेळी वीस कोटींच्या ठेवी आणि चौदा कोटी रुपयांचा संचित तोटा होता. बॅँक चालू असताना काही महाभागांनी घेतलेले कर्ज थकवले आणि न्यायालयाच्या चक्रात बॅँक अडकल्याने बॅँक नुकसानीत गेली. अशाप्रकारे एकेकाळी नावाजलेल्या चौंडेश्वरी बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने ३० आॅगस्ट २०१४ रोजी मोडॅटोरियम पिरीयड लागू केला. बॅँकेवर तेव्हापासून आर्थिक निर्बंध आहेत. दरम्यानच्या काळात समृद्धी को-आॅप. क्रेडिट सोसायटीने चौंडेश्वरी बॅँकेत त्यांची पतसंस्था विलीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बारगळला. दरम्यान, पुणे येथील जनता सहकारी बॅँकेने विलीन करण्याचा प्रस्ताव दिला. त्याप्रमाणे एक वर्षापूर्वी पुणे जनता सहकारी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चौंडेश्वरी बॅँक विलीन करून घेण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर चौंडेश्वरी सहकारी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चौंडेश्वरी बॅँक जनता बॅँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आणि पुढे ही प्रक्रिया सुरू झाली.दरम्यानच्या काळात डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी पंधरा उमेदवारच निवडणूक रिंगणात उभे राहिले. म्हणून (पान १० वर)पुनर्विचार करण्यासाठी १० जूनला विशेष सभादरम्यान, पुण्यातील जनता सहकारी बॅँकेत विलीन होण्यासाठी पुनर्विचार करण्यास चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची १० जूनला विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे या बॅँकेच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याची चर्चा आहे.