शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

क्लोरीन गळतीने सहाजण गुदमरले

By admin | Updated: July 30, 2015 00:54 IST

दोघे गंभीर : कसबा बावडा ‘एसटीपी’ केंद्रातील घटना; पोलिसांकडून चौकशी सुरू

कसबा बावडा : येथील ‘झूम’ प्रकल्पाशेजारी असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सांडपाणी केंद्रात (एसटीपी) बुधवारी सकाळी दहा वाजता सिलिंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. या वायूची बाधा झाल्याने येथील सहा कर्मचारी अत्यवस्थ होऊन खाली कोसळले. यातील चार कर्मचाऱ्यांना तातडीने सीपीआरमध्ये, तर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अक्षय सदाशिव मगदूम (रा. फुलेवाडी), हेमंत सुधाकर काशीद (रा. शनिवार पेठ), विक्रम पंडित देवार्डे, भरत रामचंद्र इंगवले, विक्रम महादेव चौगले व राहुल प्रकाश भोसले (सर्व रा. कसबा बावडा) अशी क्लोरीनची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अक्षय मगदूम व राहुल भोसले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुमारे ७६ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस प्रा. लि. कंपनीकडे बी.ओ.टी. तत्त्वावर चालविण्यास आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत होता. जयंती नाला येथून सांडपाणी आणून त्यावर विविध प्रक्रिया करून त्यानंतर हे पाणी नदीत सोडले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर या ठिकाणी केला जातो. या प्रकल्पाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये क्लोरीन वायूची भली मोठी सिलिंडर ठेवण्यात आली आहेत. त्यातील एका सिलिंडरला बुधवारी सकाळी गळती लागली. त्यामुळे क्लोरीन वायू या ठिकाणी पसरल्याने कर्मचाऱ्यांना या वायूची लगेचच बाधा झाली. येथे असणारे सहाही कर्मचारी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी त्वरित रुग्णालयात हलविले. गळती लागलेले सिलिंडर तत्काळ के्रनच्या साह्याने सांडपाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या क्षेत्र अधीक्षक वर्षा कदम यांनी पाहणी केली. यावेळी दिलीप देसाई यांनी विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापक एस. नरेंद्र यांना खडे बोल सुनावले.क्लोरीन वायूचा हवेत थरक्लोरीन वायू हा काहीसा जाड असल्यामुळे तो हवेत लगेच मिसळत नाही. साधारण जमिनीपासून पाच फूट अंतरावर तो तसाच तरंगत राहतो. त्याच्या सहवासात ज्याचा संपर्क येतो, त्याला या वायूची लगेच बाधा होते.‘ते’ सिलिंडर कोणाचेघटनास्थळवरील सिलिंडर आपले नाही, ते महापालिकेचे आहे, असे विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते आपले नसल्याचा इन्कार केला.तपास सुरूदरम्यान, या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही, परंतु तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मुंडे यांच्याकडे जबाबदारी दिली.योग्य काळजी न घेतल्यानेच दुर्घटना...महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. त्यासाठी तिथे क्लोरीन यार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे प्रत्येकी ९०० किलोग्रॅमची पाच सिलिंडर भरून ठेवलेली होती. ती सुरक्षित राहावीत अशी कोणतीही काळजी या केंद्राचा ठेका घेतलेल्या विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून घेण्यात आलेली नव्हती.जुन्या गंजलेल्या सिलिंडरमधून सकाळी दहाच्या सुमारास ही गळती सुरू झाली. त्या परिसराजवळ नागरी वस्ती नाही, परंतु पुढील बाजूस काही वसाहती झाल्या आहेत. तेथील लोकांना जाऊन सावध करण्यात आले. सुरुवातीला कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून तोंडाला कापड बांधून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही.सिलिंडरचे वजन जास्त असल्याने ते त्यांना हलविता येईना. उलट गळती लागलेल्या क्लोरीन वायूचा त्रास झाला. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना बोलाविण्यात आले. त्यांनी प्रयत्न करून हे सिलिंडर उचलून थेट शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत नेऊन टाकले. पाण्यात क्लोरीन विरघळल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली.