शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत

By संदीप आडनाईक | Updated: April 28, 2024 19:50 IST

चित्रपटानंतर टाउन हॉल बाग, शाहू महाराज समाधीस्थळ, गंगाराम कांबळे स्मारकाला भेट.

कोल्हापूर : चिल्लर पार्टीने बाराव्या वर्धापनदिनानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्यावस्त्यांमधील १४ शाळांमधील ३९० शालेय विद्यार्थ्यांनी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात मोठ्या पडद्यावर प्रथमच बालचित्रपट पाहिला. या मुलांना राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ, गंगाराम कांबळे स्मारक आणि टाउन हॉल बागेतील वस्तुसंग्रहालय दाखवले. 

शाहू स्मारक भवन येथे शाहुवाडी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी १४ शाळांमध्ये ग्रंथालय सुरु करण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे १० पुस्तकांचा संच आणि वह्या भेट देउन सहभागी शाळांचे स्वागत केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. भगवान हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले, चंद्रकांत निकाडे, प्रा. दीपक भोसले उपस्थित होते.  प्रतिक्षा पिंगळे आणि समीक्षा बोटांगळे या विद्यार्थिनींनी चिल्लर पार्टीचे आभार मानले. यावेळी योगेश पिंगळे, संदीप पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले. चिल्लर पार्टी चांगला माणूस बनण्याचे शिक्षण देत आहे, या संस्कारातून मुलांनी मोठी रेघ बनण्याचा प्रयत्न करावा,अशी अपेक्षा यावेळी विश्वास सुतार यांनी व्यक्त केली. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. सलीम महालकरी यांनी आभार मानले. मुलांनी ‘गॉड्स मस्ट बी क्रेझी २’ या सिनेमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद नाईक,ओंकार कांबळे, चंद्रशेखर तुदिगाल, नसीम यादव, देविका बकरे, सुधाकर सावंत, मिलिंद कोपार्डेकर, विजय शिंदे, शैलेश चव्हाण, डॉ. शशिकांत कुंभार, महेश नेर्लीकर, अभय बकरे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, रविंद्र शिंदे यांनी केले.

१४ वाड्या वस्त्या सहभागी

या कार्यक्रमात जिल्ह्यातील निळे, माण, वारुळ, नांदगाव, परळी, घुंगूर, कोनोली तर्फ असंडोली,  गुजरवाडी, बुरंबाळ, कांटे, बरकी, अणुस्कुरा, शिराळे आणि भेडसगाव या वाड्यावस्त्यांतील शाळा सहभागी झाल्या.  सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

प्रतीक्षा पिंगळेचा खास सत्कारपिंगळे धनगरवाडा येथे पहिली ते चौथी शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी साडे तीन किलोमीटर जंगलातून निळे गावापर्यंत चालत अतिशय कष्टप्रद वातावरणात पुढे मलकापूर येथे जाउन या गावच्या प्रतीक्षा पिंगळे हिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. ती या गावची पहिली बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. या विदयार्थिनीचा सुतार यांच्या हस्ते पुस्तकाचा संच भेट देउन खास सत्कार करण्यात आला. पुढील शिक्षण शहरात घेणार असल्यास चिल्लर पार्टी तिला मदत करेल असे मिलिंद यादव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर