शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यात बालदिन उत्साहात

By admin | Updated: November 14, 2014 23:59 IST

जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन : प्रतिमा पूजन, रॅली, व्याख्यान,स्वच्छता अभियान, आदी उपक्रम

कोल्हापूर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती व बालदिन जिल्ह्यात विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थातर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा पूजन, रॅली, व्याख्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव, स्वच्छतेची शपथ, आदी उपक्रम उत्साहात पार पडले.इचलकरंजी परिसरइचलकरंजी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते.कॉँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य, एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. शहर चिटणीस प्रा. शेखर शहा यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, प्रदेश कॉँग्रेसचे सचिव प्रकाश सातपुते, शामलाल यादव, शामराव कुलकर्णी, आदी उपस्थित होते. जयसिंगपूर महाविद्यालयजयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागाच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ. एम. एम. गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली. रॅलीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विजय असो, स्वच्छता पाळा-डेंग्यूला घाला आळा, झाडे लावा-झाडे जगवा, अशा घोषणा देण्यात आल्या.नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. पी. सावंत, प्रा. व्ही. व्ही. चौगुले, प्रा. बी. ए. पाटील यांनी केले. महाविद्यालयात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. कोडोली परिसर कोडोली : पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीच्या निमित्ताने यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज, शुक्रवारी शाळकरी मुला-मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या भाषा व जीवन कौशल्ये विकास विभागाने महाविद्यालयातील मदन माने यांचे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनावर व शाळकरी मुला-मुलींच्या आहारासंबंधी व्याख्यान झाले. त्यांनी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद उद्बोधन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले.येथील यशवंत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळकरी मुला-मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ पवार यांनी केले. जयश्री पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रवीणा कापरे यांनी आभार मानले.न्यू इंग्लिश स्कूलकुरुंदवाड : येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स् या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा यादव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. यावेळी अनुपमा पोतदार, मीनाक्षी कोलुले यांची भाषणे झाली. अंबप ग्रामपंचायतनवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्यावतीने बालदिन उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी सरपंच उषा माने होत्या.यावेळी पंडित नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाचा समारंभ सरपंच उषा माने व उपसरपंच अल्लाबक्ष मुल्ला यांच्या हस्ते झाला. ज्येष्ठ सदस्य संतोष उंडे यांनी बालदिनाविषयी मनोगत व्यक्त केले.गडहिंग्लजमध्ये अभिवादनगडहिंग्लज : काँगे्रस कमिटीतर्फे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रमिमेला अभिवादन करण्यात आले. जे. वाय. बार्देस्कर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. तानाजी कुरळे, आझाद पटेल, बार्देस्कर, प्रा. तानाजी चौगुले, प्रा. महेश चौगुले यांनी मनोगत व्यक्तकेले. यावेळी अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, शकुंतला कुराडे, के. व्ही. पेडणेकर, प्रा. अनिल कुराडे, एम. एस. घस्ती, अरुण कुलकर्णी, अश्विन यादव, रवींद्र खोत, अमोल हातरोटे, उपस्थित होते. हलकर्णी परिसरहलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरातील विविध शाळांत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व बालदिन साजरा करण्यात आला.हलकर्णी : येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक अशोक चौगुले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पर्यवेक्षक व्ही. एन. गरूड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.बसर्गे : एस. एम. हायस्कूलमध्ये आर. बी. टेळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. संजय घुले यांनी बालदिनाचे महत्त्व सांगितले. एम. एस. जोडगुद्री यांनी आभार मानले.नंदनवाड : येथील शिवराय हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक वाघराळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. येणेचवंडी : येथील प्राथमिक शाळेत शाळा समिती अध्यक्ष सचिन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष संजय बिरजे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. नेताजी मांगले, अनिल हळिंगळे यांनी मार्गदर्शन केले.