शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:53 IST

कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या नोटीसीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देमुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसाकोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाने मागविला खुलासा

कोल्हापूर : शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या नोटीसीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालयात प्रसूत झालेल्या बालकांची नोंदणी महानगरपालिका जन्म - मृत्यू नोंदणी विभागाकडे झाली आहे. माहे आॅगस्ट २०१८ या महिन्यातील जन्म नोंदणी अहवालाची पडताळणी केली असता, काही रुग्णालयात जन्माला येणाऱ्या पुरुष अपत्यांच्या संख्येच्या तुलनेत स्त्री अपत्यांची संख्या कमी असल्याची बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे.

शहरातील एका रुग्णालयात आॅगस्ट २०१८ मध्ये पुरुष अपत्य ३२, तर स्त्री अपत्य २४ जन्माला आली आहेत. अशीच परिस्थिती शहरातील अनेक रुग्णालयांत आढळून आली आहे. ही बाब चिंताजनक असून, लिंग गुणोत्तराचे प्रमाण अधिक व्यस्त होत आहे. या मागील कारणमीमांसाबाबत लेखी खुलासा करावा म्हणून डॉ. पाटील यांनी शहरातील १६ हून अधिक रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या आहेत.आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या पत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. एकीकडे सोनोग्राफी तपासणी, लिंग तपासणी याला शहरात पूर्णत: बंदी असताना आणि अशी सर्व मशिन्स जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडली गेली असताना, अशा प्रकारे सरसकट डॉक्टरांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अशा नोटिसा पाठविण्यापेक्षा ज्यांच्याकडे सोनोग्राफी मशिन्स आहेत, त्यांच्यावरच अधिक नियंत्रण ठेवावे, अशी सूचना पुढे आली आहे.सांगली शहरातील गणेशनगर येथे अलिकडेच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या हॉस्पिटलवर छापे टाकून त्यांना अटक केली होती. या चौगुले डॉक्टर दांपत्यांचा कोल्हापूर शहर परिसरातील काही डॉक्टरांशी कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी शहरातील काही रुग्णालयात जन्मलेल्या अपत्यांची माहिती घेऊन, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला असता, ही चिंताजनक बाब समोर आली; त्यामुळे त्यांनी नोटीस अस्त्र उगारले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी